शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग निदानप्रकरणी ग्रामसेवक पतीला अटक

By admin | Updated: July 27, 2016 03:58 IST

मुली होत असल्याने विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी विवाहितेचा ग्रामसेवक पती महेंद्र दिगंबर लोणकर

वडगाव निंबाळकर : मुली होत असल्याने विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी विवाहितेचा ग्रामसेवक पती महेंद्र दिगंबर लोणकर (रा. माळवाडी ता. बारामती) याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अन्य अजुनही फरार आहेत. बारामती तालुक्यातील लोणी भापकरनजीक माळवाडी येथील विवाहितेचे गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणी एका कुटुंबातील पाच जणांवर, गर्भपात करण्यास मदत करणारे अज्ञात दोन इसम व डॉक्टर अशा आठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत विवाहितेने तक्रार दिली होती. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर घरातील व्यक्तींनी छळ करत गर्भलिंग निदान करून जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक आरोपीस अटक केली आहे. इतर सात आरोपी अजूनही फरार आहेत. ग्रामसेवक पदाचा कारभार सांभाळणाऱ्या एका जबाबदार व्यक्तीकडून असे कृत्य केले आहे. हे प्रकरण अतिशय गंभीरअसून, यात आरोपी असलेले, गर्भपात करण्यास मदत करणारे अज्ञात दोन इसम व डॉक्टर यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केली आहे.(वार्ताहर)