शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील उमेदवारांची कोटींची उड्डाणे

By admin | Updated: February 15, 2017 01:54 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २

इंदापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांमध्येदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सरशी साधली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारप्रवीण दशरथ माने यांची एकूण चल-अचल संपत्ती २६ कोटी ८३ लाख ३३ हजार ३१२ रुपये एवढी नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल वालचंदनगर-कळस जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वैशाली प्रतापराव पाटील यांचे नाव आहे. माजी आमदार स्व. गणपतराव पाटील यांच्या स्नुषा असलेल्या पाटील यांच्याकडे १० कोटी २० लाख २६ हजार ५०० रुपयांची एकूण संपत्ती आहे.नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गटांतील ९ उमेदवार आणि पंचायत समिती ८ गणांतील ११ असे २० उमेदवार कोट्यधीश आहेत. पदव्युत्तर व पदवीपर्यंत शिक्षण झालेले १५ जणच आहेत. उर्वरित सर्व दहावी ते बारावी झालेले आहेत. यापेक्षा कमी शिक्षण झालेही आहेत. गणासाठी पदव्युत्तर उमेदवार दोन, पदवीधर नऊ, दहावी व त्यापुढील बारा, दहावीच्या आतील सात उमेदवार आहेत. तर, जिल्हा परिषदेला पदव्युत्तर उमेदवार दोन, पदवीधर दोन, दहावी व त्यापुढील आठ, दहावीच्या आतील चार उमेदवार आहेत.तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी ४५ व पंचायत समितीसाठी १०१ असे १४६ उमेदवार रिंगणात आहेत. गटातील कोट्यधीश उमेदवार : गणपत महीपत कड (भाजपा), तानाजी बबन काकडे (काँग्रेस), दिलीप सोपान यादव (शिवसेना), आनंद नारायण धसाडे (भाजपा), शालिनी शिवाजी पवार (शिवसेना), ज्योती राजाराम झेंडे (शिवसेना), सुदाम कोंडिबा इंगळे (राष्ट्रवादी), दत्तात्रेय मारुती झुरंगे (काँग्रेस), अ‍ॅड. शिवाजी गुलाब कोलते (शिवसेना).गणातील कोट्यधीश उमेदवार :सोनाली कुलदीप यादव, अर्चना राहुल गायकवाड, अ‍ॅड. मानसी शरद जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), महेश रामदास खैरे, अ‍ॅड. विजय सोमनाथ भालेराव (काँग्रेस), गोरखनाथ बाबूराव माने (शिवसेना), दत्तात्रेय सोपान शेंडकर (मनसे), दत्तात्रेय शंकर काळे (शिवसेना), दिलीप मारुती झेंडे (काँग्रेस), सागर पंढरीनाथ काळे (मनसे), रमेश एकनाथ जाधव (शिवसेना).निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांत संजय असवले यांनी सांगितले, की उमेदवारांचे शिक्षण, वय, मालमत्ता, वार्षिक उत्पन्न ही सर्व माहिती यंदा प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स करून लावली जाणार आहे.आंबेगाव तालुक्यात १७ उमेदवार करोडपतीघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या ६४ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांची संपत्ती कोटीच्या घरात आहे. जिल्हा परिषदच्या चार जागा सर्वसाधारण असल्याने येथे अनेक करोडपती उमेदवार उभे आहेत. एकूण उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९, शिवसेनेकडे ६, भाजपाकडे २ व १ अपक्ष उमेदवार करोडपती आहेत. काहींवर मोठमोठी कर्जदेखील आहेत. तर काही उमेदवारांकडे संपत्तीच नाही. तसेच शिक्षणाबाबतही बहुतेक उमेदवार दहावी व बारावीच्या जवळपासच आहेत. दोन उमेदवार पूर्ण अशिक्षित आहेत. डॉ. ताराचंद कराळे हे डॉक्टर उमेदवार घोडेगाव/पेठ गटातून उभे आहेत तर रूपाली झोडगे या फार्मसिस्ट घोडेगाव गणातून उभ्या आहेत. बाकी बहुतांश ठिकाणी शेतकरी महिला निवडणुकीसाठी उभ्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या करोडपती उमेदवारांमध्ये तुलसी सचिन भोर संपत्ती ५ कोटी ६९ लाख ८८ हजार, नंदा शंकर सोनावळे संपत्ती ४ कोटी ६१ लाख ८३ हजार ७०२, संपतराव विठ्ठलराव बाणखेले संपत्ती ४ कोटी ०४ लाख ७४ हजार ४८४, विवेक प्रतापराव वळसे पाटील संपत्ती ३ कोटी ६४ लाख ९९ हजार ३३७, संतोष यमनाजी भोर संपत्ती २ कोटी ५८ लाख ३३ हजार ४०७, अरुणा दत्तात्रय थोरात संपत्ती १ कोटी ९७ लाख ०१ हजार ८६६, रूपाली सुनील झोडगे संपत्ती १ कोटी ९६ लाख ४१ हजार ११५, उषा रमेश कानडे संपत्ती १ कोटी ३५ लाख ५००, कैलास भीमाजी काळे संपत्ती १ कोटी १८ लाख ३० हजार यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये प्रज्ञा सुरेश भोर संपत्ती ११ कोटी ९५ लाख ४३ हजार ७२९, अरुण गोविंदराव गिरे संपत्ती ४ कोटी ७४ लाख १६ हजार ४३८, सुनील दामोदर बाणखेले संपत्ती ४ कोटी ७१ लाख ८५ हजार ५५०, देविदास दत्तात्रय दरेकर संपत्ती १ कोटी ९१ लाख ७६ हजार, शीतल राम तोडकर संपत्ती १ कोटी ३८ लाख ५३ हजार ५००, अलका शिवाजी घोडेकर संपत्ती १ कोटी १७ लाख ६९ हजार ७९८ संपत्ती आहे. भाजपाच्या उमेदवारांमध्ये डॉ. ताराचंद देवराम कराळे संपत्ती १० कोटी ५० लाख ५९ हजार ७४३, संजय जिजाबा थोरात संपत्ती ९ कोटी ३४ लाख ८ हजार संपत्ती आहे. अपक्षांमध्ये राजाराम भिवसेन बाणखेले संपत्ती २ कोटी ९२ लाख ६४ हजार ९०३ रुपयांची संपत्ती आहे. या सर्व उमेदवारांमध्ये प्रज्ञा सुरेश भोर व डॉ. ताराचंद कराळे हे सर्वात श्रीमंत आहेत तर बाबाजी दगडू देवडे व हानिफ सिराज मुजावर यांची संपत्ती अवघी ५५०० रुपये आहे. आरक्षण असलेल्या ठिकाणी उभे असलेल्य उमेदवारांमध्ये अतिशय किरकोळ संपत्ती दिसून येते. रत्नप्रभा पाटील यांची संपत्ती ८ कोटी ८९ लाख...४तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रत्नप्रभा शहाजीराव पाटील आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री असणाऱ्या पाटील यांच्याकडे ८ कोटी ८९ लाख ८७ हजार ७८९ रुपये व ५२ पैसे इतकी संपत्ती आहे. ४काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार ऋतुजा पाटील यांच्याकडे ३ कोटी १५ हजार रुपये एवढी चल-अचल संपत्ती आहे.४माजी आमदार स्व. राजेंद्रकुमार घोलप यांचे नातू करणसिंह घोलप यांच्याकडे ९३ लाख २५ हजार ५५१ रुपये, अभिजित तांबिले यांच्याकडे ७७ लाख ७४ हजार ११३ रुपयांची एकूण संपत्ती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.संपत्ती विवरणपत्राचे फलक लावण्याचे आदेश ४एखाद्या उमेदवाराने जाणीवपूर्वक संपत्ती विवरणपत्रात ज्ञात स्रोतापेक्षा कमी संपत्ती जाहीर केली असेल, तर संबंधित गावातील लोकांना त्यांची आर्थिक स्थिती माहिती असते. निवडणुकीपूर्वीची संपत्ती व निवडून आल्यानंतरच्या संपत्तीत होणारी वाढ लक्षणीय असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदान केंद्राबाहेर मतदानादरम्यान संपत्ती विवरणपत्राचे फलक लावण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली.