शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

भोरमधील ग्रामपंचायतीत सत्तांतर

By admin | Updated: October 30, 2015 00:05 IST

तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ३० जागांपैकी १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

भोर : तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ३० जागांपैकी १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. गावातील राजकीय नेत्यांच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची निवडणूक महत्त्वाची असल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत पेंजळवाडी व आळंदेवाडी, कासुर्डी खे.बा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे.भोर तालुक्याच्या पूर्व भागातील पेंजळवाडी ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या आहे. ४ जागांसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झालेल्या तीनपैकी २, तर निवडणूक लागलेल्या चारपैकी तीन, अशा ७ पैकी पाच जागा जिंकून ग्रामपंचायत कॉँग्रेसने ताब्यात घेतली आहे. यात गजानन किसन चव्हाण (११७ मते विजयी), कल्पना बाळू चव्हाण (९१ मते विजयी), विजय नारायण चव्हाण (७८ मते), सारिका गजानन चव्हाण(२०० मतेविजयी), तर हेमलता चंद्रकांत चव्हाण, सारिका प्रकाश चव्हाण, विलास रमेश चव्हाण हे बिनविरोध निवडून आले आहेत. महामार्गावरील महत्त्वाची असलेली कासुर्डी खे.बा ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण असून ९ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात संतोष वामन गायकवाड (२०५ मते विजयी), कविता राहुल लाड (२०६ मते विजयी), स्वाती श्रीकांत लाड (२०१ मते विजयी), शकुंतला तुकाराम नागडे (१६९ मते विजयी), सुधाकर ज्ञानोबा कोंडे (१६० मते विजयी), संभाजी बबन नागडे (१८४ मते विजयी), वैशाली अशोक खाडे (१७५ मते विजयी), शकुंतला तुकाराम नागडे (१८४ मते विजयी), कल्पना अशोक कोंडे (१६५ मते विजयी), संतोष कोंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. गोकवडी ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर २ जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत होते. यात इंदुबाई रमेश बांदल (७६ मते विजयी),रणधीर गोपाळ चव्हाण (१०६ मते विजयी), हय्याज अब्दुल शेख, रंजना पांडुरंग पवार, पौर्णिमा संदीप बांदल, सागर कृष्णा बांदल, धनश्री गणेश बांदल हे बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंचपद सर्वसाधारण आहे.आळंदेवाडीत ७ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. २ जागांसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत होते, यात रवींद्र गेनबा गाडे (१०१ मते विजयी), प्रतिभा मधुकर पवार (१४८ मते विजयी), तर रेखा अरविंद गाडे, सतीश दत्तात्रय बरदाडे, छाया राहुल गव्हाणे, गणेश दत्तात्रय धोत्रे, चांदणी भगवान सणस हे बिनविरोध निवडून आले आहेत.