शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रावणगावला माकडांसाठी धान्य

By admin | Updated: November 18, 2016 06:09 IST

रावणगाव (ता. दौंड) येथील तरुणांनी भुकेने व्याकूळ झालेल्या माकडांसाठी धान्य गोळा करून आजच्या तरुण पिढीसमोर भूतदयेचा

राजेगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील तरुणांनी भुकेने व्याकूळ झालेल्या माकडांसाठी धान्य गोळा करून आजच्या तरुण पिढीसमोर भूतदयेचा एक आदर्श ठेवला आहे. ग्रामदैवत शिरसाईदेवी आणि येथील देवीची माकडे हे अनन्यसाधारण नातं आहे असं मानलं जाते. गेल्या सात-आठ महिन्यांपासून येथील तरुण येथील माकडांसाठी धान्य गोळा करीत आहेत. माकडांना धान्य खाण्यासाठी येथील हनुमान मंदिरासमोर लोखंडी ट्रे ठेवले आहेत. त्यामध्ये धान्य ठेवले जाते. शेजारी पाण्याच्या कुंड्याही ठेवल्या आहेत. रावणगावमधील शिरसाईदेवीच्या माकडांना खाण्यासाठी धान्य नसल्याने माकडांची उपासमार होऊ लागली होती. खाण्याची भ्रांत म्हणून येथील माकडे स्थलांतरित होऊ लागल्याने माकडांची संख्या कमी होऊ लागली होती. काही माकडे अन्नाच्या शोधात रानोमाळ भटकू लागली होती. रावणगावचे वैभव असणारी वानरसेना हळूहळू नामशेष होईल की काय? या भीतीने येथील तरुण एकत्र आले. येथील प्राध्यापक रमेश आटोळे यांनी माहितीपत्रके छापून गावात व गावातल्या सर्व वाड्यावस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी चिकटवली. अजित आटोळे यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून स्वखुशीने धान्य देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. यामधून येथील माकडांसाठी चार गोण्या धान्य जमा झाले. याकामी दत्तात्रेय नाळे, राहुल फाजगे यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे येथील माकडांचा पुढील चार-पाच महिन्यांच्या खाण्याचा प्रश्न मिटला आहे. (वार्ताहर)