शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पीओएस प्रणालीद्वारे धान्यवितरण

By admin | Updated: January 14, 2017 02:59 IST

पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील स्मिता भोर यांच्या दुकानाची निवड करण्यात आली.

अवसरी : पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील स्मिता भोर यांच्या दुकानाची निवड करण्यात आली. त्यानुसार ग्राहकांच्या समोर पीओएस प्रणालीचा वापर करून प्रत्यक्ष धान्याचे वितरण करण्यात आले.महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभागाने संपूर्ण धान्याच्या वाटपासाठी ईपीडीएस प्रणाली सुरू केली आहे. आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील स्वस्त धान्य दुकांनामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी व ग्रामस्थांसमोर पीओएस मशीनद्वारे प्रणालीचा वापर करून प्रत्यक्ष धान्याचे वितरण करण्यात आले. प्रत्येकी ४ कार्डधारकांना मशीनद्वारे शिधा वस्तूंचे यशस्वीरीत्या वितरण करण्यात आले.अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेला सधन शिधापत्रिका धारकांनी स्वत:हून या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी केले. अशा तऱ्हेने योजनेमधून बाहेर पडणाऱ्या शिधापत्रिकेऐवजी गोरगरीब लोकांसाठी अन्नधान्याचा उपयोग होईल, असे ते म्हणाले. या वेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, जिल्हा पुरवठा तहसीलदार उत्तम बढे, जिल्हा पुरवठा अव्वल कारकून अनिल टेमक, पुरवठा निरीक्षक फकिरा मंडलिक, जिल्हा टेक्निकल पर्सन संतोष देशमुख, एनआयसी प्रतिनिधी विठ्ठल गायकवाड, मंडलाधिकारी दीपक मडके, कामगार तलाठी आर. एल. इलग उपस्थित होते.मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील पी. व्ही. खुराणा यांच्या स्वस्त धान्य दुकानाचीही पीओएस मशीनद्वारे प्रणालीचा वापर करून प्रत्यक्ष धान्याचे वितरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)