शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संचालकांकडून गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी

By admin | Updated: May 7, 2014 01:31 IST

गटशिक्षणाधिका-यांकडून शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना हेळसांड केली जाते. त्यांनी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात आणि प्रत्यक्ष हजर राहून सर्व धोरणे प्रत्यक्षात आणावीत. अन्यथा सचिवांकडे तक्रार करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशा शब्दांत राज्य शिक्षण-संशोधन परिषदेचे आयुक्त एन. के. जरग यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी केली.

पुणे : गटशिक्षणाधिकारी हा शिक्षणव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. मात्र, काही अधिकार्‍यांकडून शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना हेळसांड केली जाते. त्यांनी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात आणि प्रत्यक्ष हजर राहून सर्व धोरणे प्रत्यक्षात आणावीत. अन्यथा सचिवांकडे तक्र ार करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशा शब्दांत राज्य शिक्षण-संशोधन परिषदेचे आयुक्त एन. के. जरग यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची कानउघडणी केली.परिषदेतर्फे यंदा बदललेल्या तिसरी-चौथीच्या अभ्यासक्र माबाबत राज्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सहसंचालिका शकंुतला काळे उपस्थित होत्या. जरग म्हणाले, शासकीय नियम शेवटच्या स्तरापर्यंत राबविणारा गटशिक्षणाधिकारी हा महत्वाचा शासकीय घटक आहे. त्यासाठी शिक्षक आणि अधिकारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. या अधिकार्‍यांनी शैक्षणिक धोरण राबविले जात असताना त्याठिकाणी उपस्थित असले पाहिजे. विद्यार्थ्यांचे संगीत शिक्षण किंवा मैदानावरील प्रात्यक्षिके घेतली जात असताना त्यांची नोंद स्वत: हजर राहून करावी. अशावेळी अधिकार्‍यांची असलेली उपस्थिती शिक्षणव्यवस्थेत बदल घडवून आणण्यास महत्वाची भूमिका बजावले. अन्यथा, काहीजण केवळ मोबाईलवरून अशा नोंदी घेतात. अशी परिस्थिती धोकादायक ठरेल. कामातील या बेजबाबदारपणाची शिफारस थेट सचिवांपर्यंत करण्यात येईल. कुणाचा कुणाला मेळ नाही,अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती. आता ती बदलली पाहिजे.नव्या शिक्षण व्यवस्थेत पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नाही, असा समाजामध्ये गैरसमज आहे. परीक्षा आहेत, मात्र त्यांचे प्रकार वेगळे आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन होणार आहे. ही बाब गटशिक्षणाधिकार्‍यांनी सर्वांच्या लक्षात आणून द्यावी. पाठ्यपुस्ताकापलीकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांपुढे मांडण्यासाठी अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा.याबाबत जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाकिधारी के. डी. भुजबळ म्हणाले, नव्या अभ्यासक्र मानुसार ज्ञानरचनावाद काय आहे, याची माहिती आम्हाला या प्रशिक्षणातून मिळाली. अधिकार्‍यांसाठी हा वेगळा अनुभव आहे. कामामध्ये ढिसाळपणा ठेवू नका, ही संचालकांनी केलेली सूचना योग्यच आहे.