शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तावरे कॉलनीतील भूखंड बळकावण्याचा डाव

By admin | Updated: July 8, 2017 03:05 IST

मित्रमंडळ चौकातील ९ एकर भूखंड बळकावण्याच्या प्रकारानंतर आता तावरे कॉलनी येथील शाळेच्या आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी

पुणे : मित्रमंडळ चौकातील ९ एकर भूखंड बळकावण्याच्या प्रकारानंतर आता तावरे कॉलनी येथील शाळेच्या आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (एसआरए) घाट घातला जात आहे. महापालिकेने या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे १० कोटी ४१ लाख रुपये जमा केल्यानंतरही हा प्रकार होत आहे, हे विशेष! नगरसेवक आबा बागुल यांच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.पर्वती येथील स. नं. ४७ वर तावरे कॉलनी येथे हा भूखंड आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यावर विकास आराखड्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तसा निर्णय घेतला आहे. भूसंपादनासाठी म्हणून राज्य सरकारकडे महापालिकेने १० कोटी ४१ लाख रुपये जमा केले आहेत. असे असताना याच जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनाचा घाट घातला गेला. तसा आराखडाही महापालिकेकडेच सादर करण्यात आला.विकसक, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हात यामागे असल्याचा आरोप बागुल यांनी केला. तेथील नागरिकांना धमकावणे, त्यांच्या घरावर चिठ्या लावणे असे प्रकार सुरू करण्यात आले आहेत. झोपडपट्टी पुवर्नसन करायचे असेल, तर तेथील नागरिकांची तशी मागणी असणे आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीही मागणी नसताना तसेच महापालिका अधिकाऱ्यांची कसलीही परवानगी न घेता या जागेचा वापर करण्याचा प्रकार संगनमताने होत आहे.आयुक्तांनी घेतली दखल1त्यांनी थेट आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच तक्रार केली आहे. मित्र मंडळ चौकातील एक भूखंड बळकावण्याचा प्रकार होत आहे. यासाठी महापालिकेला न्यायालयीन लढाया कराव्या लागत आहेत. आता पुन्हा हा दुसरा प्रकार उघड होत आहे. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाला महापालिकेच्या मालमत्तांची निगराणी करण्यात अपयश येत असल्याचेच यातून दिसते, अशी टीका बागुल यांनी केली. महापालिकेच्या किती जागा आहेत, याची त्यांच्याकडे व्यवस्थित नोंद नाही. अनेक जागा ताब्यातच नाहीत. ज्या आहेत, त्यांच्यावर कायदेशीर नावे लागलेली नाहीत, ती लागावीत यासाठी प्रयत्न होत नाहीत, अशा अनेक गोष्टी बागुल यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या.2 आयुक्तांनी याची दखल घेऊन या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. याशिवाय महापालिकेच्या मालकीच्या जागांची, रिकाम्या भूखंडांची माहितीही त्यांनी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून मागवली आहे. ज्या भूखंडांबाबत कायदेशीर खटले सुरू आहेत, त्यात महापालिकेने काय भूमिका घेतली, याबाबतही त्यांनी विधी विभागाकडून अहवाल मागविला असल्याची माहिती बागुल यांनी दिली.