शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जीपी, टीपी नावाला; बोगस नोंदीला ऊत आला!

By admin | Updated: November 5, 2014 05:29 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देण्यास बंदी घातली असतानाही जिल्ह्यात सर्रास बोगस नोंदी सुरू आहेत

सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेजिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देण्यास बंदी घातली असतानाही जिल्ह्यात सर्रास बोगस नोंदी सुरू आहेत. यामध्ये टाऊन प्लॅनिंग (टीपी) वा ग्रामपंचायत प्लॅनिंग (जीपी) परवानगी न घेता, अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. तर, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नसल्याची सबब पुढे करीत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.नऱ्हे येथील इमारत दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २०१० मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बांधकामांच्या नोंदी घालण्यास बंदी घातली आहे. तरीदेखील जिल्ह्यात सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू असून, ग्रामपंचायतीदेखील नोंदी घालत असल्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने हवेली व खेड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची पाहणी केली. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये अनधिकृत बांधकामांच्या नोंदी घालण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेने हवेली तालुक्यातील १४ व खेड तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची पाहणी केली. यामध्ये सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अनधिकृत बांधकामांच्या नोंदी घातल्या असल्याचे दिसून आले आहे. हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाहणीमध्ये अनेक स्वरूपाची धक्कादायक माहिती समोर आली असून, केशवनगर, नऱ्हे, आंबेगाव बु., आंबेगाव खु, मांजरी बु., फुरसुंगी या सहा ग्रामपंचायतींमध्ये एक हजारापेक्षा अधिक बोगस नोंदी आढळून आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील बांधकामांची आता फेरतपासणी करण्यात येणार आहे. या बोगस नोंदीमध्ये सर्वांधिक नोंदी या व्यावसायिक असल्याच्या व कोणत्याही प्रकारच्या परवनागी न घेता देखील बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. एकट्या हवेली तालुक्यात १६ हजार बोगस नोंदी झाल्या असताना, जिल्ह्यात किमान पन्नास हजारांपेक्षा अधिक बोगस नोंदी झाल्या असल्याची शक्यता आहे.