शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद मांगडे ठरला ‘लाल मातीचा राजा’

By admin | Updated: February 17, 2016 01:06 IST

येथील पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धेत मांगडेवाडीचा पैलवान गोविंद मांगडे याने सासवडच्या पैलवान रघुनाथ जगताप याला चितपट करीत पुरंदरच्या लाल मातीचा राजा किताब पटकावला

नारायणपूर : सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धेत मांगडेवाडीचा पैलवान गोविंद मांगडे याने सासवडच्या पैलवान रघुनाथ जगताप याला चितपट करीत पुरंदरच्या लाल मातीचा राजा किताब पटकावला. सुमारे २० ते २५ मिनिटे गोविंदने रघुनाथवर पकड ठेवली होती. एकेरीकस या डावावर गोविंदने रघुनाथला चितपट करीत मानाचा ‘पुरंदरच्या लाल मातीचा राजा’ किताब व चांदीची गदा पटकावली. जि. प. सदस्य पैलवान कुलदीप कोंडे यांनी या कुस्तीचे पंच म्हणून काम पाहिले. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने सासवड येथील भैरवनाथ कुस्ती आखाड्यामध्ये या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. माजी आमदार चंदुकाका जगताप, युवानेते संजय जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांच्या हस्ते पैलवान गोविंद मांगडे याला २१ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्रक, चांदीची गदा आणि मानाचा ‘पुरंदरच्या लाल मातीचा राजा’ किताब, तर उपविजेता पैलवान रघुनाथ जगताप याला १५ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्रक व ट्रॉफी देण्यात आली. याप्रसंगी आॅलिम्पिक वीर ज्येष्ठ मल्ल मारुती आडकर, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, दत्ता गायकवाड, मेघराज कटके, पंडित साबळे, मनोज मांगडे, नीलेश खटाटे, राहुल जगताप, नितीन मोडक, विजय साबळे, रोहित काळे, अक्षय मोडक, राजेश जांभळे, तसेच नंदकुमार जगताप, दत्ता झुरंगे, सुहास लांडगे, अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, योगेश गिरमे, कैलास जगताप, तसेच दत्तात्रय गवळी, गणेश मेमाणे, पिनूशेठ काकडे, नितीन दिघे, संदीपबापू जगताप, विक्रम जगताप, जयसिंग जगताप, बाबूराव दिघे, दादा काळे, संजयनाना जगताप, अण्णा काळे, तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य उपस्थित होते.