शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : पवार

By admin | Updated: January 10, 2017 02:23 IST

‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे

कारेगाव : ‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे महंमद तुघलकी अवतार आहे. सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे,’’ असे मत शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. न्हावरा फाटा (ता. शिरूर) येथे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना निवेदन देण्यात आले.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा युवक कॉँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समिती अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, तालुकाध्यक्ष रवी काळे, युवक अध्यक्ष कुंडलिक शितोळे, महिला अध्यक्ष विद्या भुजबळ, सदाशिव पवार, बाळासाहेब नागवडे अध्यक्ष, नगरसेवक जाकीरखान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, नीलेश पवार, अमोल चव्हाण, दत्तात्रय हरगुडे, अनिल भुजबळ, लतिकाताई वराले, शंकर फराटे, बाळासाहेब भोर, शैलेश घाडगे, योगेश थोरात अजित इटनर, युवती राष्ट्रवादी काँग्रेस संगीता शेवाळे, अजय हिंगे, गिरीजा पाटील, बाळासाहेब ढमढेरे, दिलीप मोकाशी, रंगनाथ थोरात, श्रीनिवास घाडगे, पांडुरंग थोरात, जयसिंग कर्डिले, अँड. रवींद्र खाडरे, शिरीष लोळगे, पोपट दसगुडे, हाफीज बागवान, कलिम सय्यद, शिवाजीराव दरेकर, दिनकर पाडळे, हरिदास कर्डिले, सुरेश पाचर्णे उपस्थित होते.पवार म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात भाजपाने जीएसटी विधेयकाला विरोध केला आणि आता तेच विधेयक मंजुरीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. आधार कार्डसाठी विरोध केला, परंतु आता त्याच आधारचा सरकार आधार घेत आहे. नोटाबंदीमुळे विविध पिकांचा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात कामे करायची की बँकेत रांगा लावायच्या, अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे. पेटीएमसारख्या परदेशी कंपनीला दररोज शेकडो कोटी रुपयांचा नफा होत आहे. (वार्ताहर)