शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

बांधकाम खरेदी-विक्री करण्यास शासनाची टाच

By admin | Updated: November 17, 2016 02:17 IST

अनधिकृत असलेली बांधकामे खरेदी-विक्री करण्यास शासनाने टाच आणली असून, अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांचे हस्तांतरण करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात येणार

नारायणगाव : अनधिकृत असलेली बांधकामे खरेदी-विक्री करण्यास शासनाने टाच आणली असून, अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांचे हस्तांतरण करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात येणार, असा आदेश काढण्यात आल्याने अनधिकृत बांधकामांच्या खरेदी-विक्रीवर अटकाव आला आहे़ सह जिल्हा निबंधक वर्ग-१ (निश्रे) व मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे व पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी नुकतेच आदेश काढून बेकायदेशीर बांधकामांच्या खरेदी-विक्रीवर टाच आणल्याने ग्रामीण भागातील अनेक निवासी/वाणिज्य इमारतींमधील सदनिका व गाळे यांची खरेदी-विक्री थांबल्याने बिल्डरांसह अनधिकृत सदनिका /गाळे घेणाऱ्या व्यक्तींना मोठा फटका बसला आहे़ अशा प्रकारची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोपी म्हणून कारवाई होण्याचा धसका घेऊन ग्रामीण भागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीर व्यवहार बंद करण्यात आले आहेत़महानगर आयुक्त व सह जिल्हा निबंधक वर्ग-1 (निश्रे) व मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे यांनी दि़२८ /१०/२०१६ रोजी आदेश काढून ग्रामीण भागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना अनधिकृत बांधकामांसंबंधी हस्तांतरण व्यवहारांची नोंदणी न करणेबाबत आदेश दिलेले आहेत़ या आदेशानुसार पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनधिकृत बांधकामांना आळा बसावा, यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या चौथ्या सभेत मंजूर करण्यात आला होता़ ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामांची हस्तांतरण व्यवहारांची नोंदणी सर्रास होत असल्याने निश्कासन व कायदेशीर कारवाईप्रसंगी अडचणी निर्माण होत होत्या़ (वार्ताहर)