शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने वाढवलेली ११९ पदे भरू नयेत

By admin | Updated: December 24, 2014 01:35 IST

राज्य शासनाने सेवानियमावलीस मान्यता देताना परस्पर ११९ पदांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने ही पदभरती करु नये

पुणे : राज्य शासनाने सेवानियमावलीस मान्यता देताना परस्पर ११९ पदांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने ही पदभरती करु नये, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाला सवर्साधारण सभेत दिले. राज्यशासनाकडून महापालिकेच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याची टीका या वेळी सभासदांनी केली.महापालिकेने राज्यशासनाकडे ३ हजार ८७३ पदे भरण्यासह सरळसेवा नियमावली मान्यतेसाठी पाठविली होती. राज्यशासनाने सरळसेवा नियमावली आणि आकृतिबंध मान्य करुन महापालिकेकडे पाठवले आहेत. राज्य शासनाने सरळसेवा नियमावलीला मान्यता देत असताना आकृतिबंदालासुद्धा मान्यता दिली आहे. परंतु, सर्वसाधारण सभेने आकृतिबंधाला मान्यता दिली नसताना आकृतिबंधाला कशी काय मान्यता देण्यात आली, असे प्रश्न सभासदांकडून सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आले.आरपीआयचे गटनेते सिद्धार्थ धेंडे म्हणाले, की राज्यशासनाने परस्पर महापालिकेच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप केला आहे. सर्वसाधारण सभेची आणि स्थायी समितीची मान्यता नसताना ११९ पदे निर्माण करण्यात आली आहेत. अशा प्रकारे त्यांच्याकडून पदे निर्मिती करता येणार नाही. शिक्षण मंडळी सेवा नियमावली राज्य शासनाने परस्पर मान्य केली केली आहे. राज्य शासनाने महापालिकेच्या अधिकारावर गदा आणली आहे.’’यावर कुणाल कुमार म्हणाले, ‘‘शासनाने सेवा नियमावली आणि आकृतिबंधाला मान्यता दिली असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. हा पदनिर्मिर्तीचा प्रस्ताव आहे त्यामुळे सर्वसाधारण सभेची मान्यता घेतल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यात येईल. शासनाला सर्वसाधारण सभेचे म्हणणे कळवण्यात येईल.’’(प्रतिनिधी)