शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर

By admin | Updated: June 27, 2014 22:55 IST

सरकारी सेवेतील परिचारिका संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणो : अनेक वर्षापासून सरकारी सेवेतील परिचारिकांकडून केल्या जाणा:या मागण्या पूर्ण होत नसल्याने आणि परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती देऊनही त्या केल्या जात असल्याच्या कारणावरून सरकारी सेवेतील परिचारिका संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक विभागाचे उपसंचालक, बीड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक यांनी परिचारिकांना त्रस देऊन बदल्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वेळी फेडरेशनच्या खजिनदार सुमन टिळेकर उपस्थित होत्या. आठवले म्हणाल्या, ‘‘परिचारिकांच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात, आमच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, परिचारिकांना सोयीसुविधा मिळाव्यात, बदल्या करण्यात येऊ नयेत आदी मागण्यांसाठी अनेक वर्षापासून आम्ही शासनाचे दरवाजे ठोठावत आहोत, आंदोलने करीत आहोत. मात्र, शासन याची दखल घेत नसल्याने दि. 24 व 25 फेब्रुवारीला आम्ही राज्यव्यापी संप केला होता. यामध्ये सुमारे 23 हजार परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.’’
बदल्यांना त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. ती गेल्या महिन्यात संपताच काही आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी परिचारिकांच्या बदल्या केल्या. त्याच वेळी आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा त्याला स्थगिती दिली. मात्र, आम्हाला आदेश मिळाला नसल्याचे कारण दाखवून 1,2क्क् परिचारिकांच्या अन्यायपूर्ण बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने वेळोवेळी दिलेली अश्वासने न पाळल्याने आम्ही संपाचा विचार सुरू केला असून, त्या संदर्भात 6 जुलैला संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात 
वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांसह संप करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.(प्रतिनिधी)