शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला शेतकऱ्यांचं दुखणंच कळेना

By admin | Updated: January 6, 2017 06:23 IST

हातात पैसा खेळंना... जित्राबं बाजारात आणली तरी त्याला गिऱ्हाईक नाही... चार बाजार हिंडलं तरी जनावरं इकली जात न्हाईत...

बारामती : हातात पैसा खेळंना... जित्राबं बाजारात आणली तरी त्याला गिऱ्हाईक नाही... चार बाजार हिंडलं तरी जनावरं इकली जात न्हाईत... शेतकऱ्याच्या हातात चलनच राहिलं न्हाई, तर तो बाजारात कसा येईल..? या सरकारला शेतकऱ्याचं दुखणंच कळंना... अशा शब्दांत बारामती येथील जनावरांच्या बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही ग्रामीण अर्थकारण जैसे थे आहे. तरकारी, फळ, जनावरांच्या बाजारातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. नोटाबंदीनंतर ग्रामीण परिसरात मंदीची लाट कायम आहे. जनावरांच्या किमतींमध्ये निम्म्याने घट आली आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. बारामती, काष्टी, अकलूज, राशीन आदी बाजार फिरले तरी जनावरांची विक्री होत नाही. जर्र्सी गाईंचा बाजार लाखावर गेला होता. आता हा बाजार ६० हजारांच्या खाली आला आहे. दरामध्ये ५० टक्के घट झाली आहेच; परंतु जर्सी गाईंच्या मागणीत घट झाली आहे. आठवड्याला १० गाईंची विक्री होत असे. बाजारातील या वास्तव परिस्थितीमुळे व्यापारीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ८० ते ९० हजार रुपये प्रतिजोडी असणारे खिलार बैलाचे दर आता ६० ते ६५ हजार रुपये प्रतिजोडीवर घसरले आहेत. या वेळी बाजारात धुळे येथून देशी गाई विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांनादेखील या मंदीचा फटका बसल्याचे दिसून आले. साहिर सल्लू यांनी गीर जातीच्या चार गाई कालवडीसह विक्रीला आणल्या होत्या. ४० ते ५२ हजार रुपयांपर्यंत या गाईंच्या किमती ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, दिवसभरात त्यांच्या केवळ एका देशी गाईची विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)