शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय डॉक्टर, कर्मचारी पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : दारू पिऊन दोन तरुणांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व सुरक्षारक्षक यांना मारहाण केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : दारू पिऊन दोन तरुणांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व सुरक्षारक्षक यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि ८) रात्री घडली. घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. दरम्यान दोन दारुड्या तरुणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीकांत घनशाम अंभोरे (वय २४) व कन्हैया यादव ढवळे (वय २४, दोघे सध्या रा. खराबवाडी ता. खेड, मूळ रा. वसमत जि. हिंगोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक ज्ञानेश्वर मोहळे यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. मोहळे चाकण ग्रामीण रुग्णालयात काम करत असताना सोमवारी रात्री एक वाजता दोघे जण दारू पिऊन रुग्णालयात आले. या दोघांनी डॉक्टर मोहळे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षक ज्ञानेश्वर हिवराळे यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. येथे असलेले पोलिस कर्मचारी बजरंग साबळे यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले. शासकीय कामात अडथळा, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य हानी व नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम आशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

फोटो : चाकण रुग्णालयात झालेली हाणामारी