शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

धनगर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:41 IST

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.बारामती येथे अभिकाका देवकाते मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.बापट म्हणाले, की भाजपा सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. कायद्याच्या पातळीवर आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी टाटाज् इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस या संस्थेमार्फत अहवाल देण्याचे काम सुरू आहे.भाजपा प्रवक्ते गणेश हाके म्हणाले, की धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. धनगर समाजाला दिलेले आश्वासन मी पाळणार आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.तत्पूर्वी, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची ढोलताशाच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने बारामती दुमदुमली.आयोजक भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित देवकाते यांनी प्रास्तविक केले.या वेळी बारामती शहर व तालुक्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित देवकाते यांनी प्रास्ताविक केले.या वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माळेगावचे संचालक अविनाश गोफणे, डिस्टिलरीचे चेअरमन अविनाश देवकाते, रासपचे प्रदेश कोषाध्यक्ष किशोर मासाळ, अविनाश मोटे, शशिकांत तरंगे, गणपत देवकाते, सुरेश कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण आटोळे, प्रशांत सातव, लखन चव्हाण, संदीप चोपडे, हेमलता पांढरमिसे, कल्याणी वाघमोडे, आशा देवकाते आदी या वेळी उपस्थित होते. कुमार देवकाते यांनी सूत्रसंचालन केले.