शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा दृष्टिकोन शिक्षक, शेतकरीविरोधी : बेनके

By admin | Updated: March 27, 2017 02:10 IST

महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण भागातील शिक्षक व शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शिक्षक व शेतकऱ्यांच्या, तसेच

ओतूर : महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण भागातील शिक्षक व शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शिक्षक व शेतकऱ्यांच्या, तसेच ग्रामीण भागातील बँका, सहकारी संस्था यांच्या विरोधात आहे, असे मत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी ओतूर येथे व्यक्त केले.ओतूर-पिंपरी पेंढार जि. प. गटाचे नवनिर्वाचित सदस्य मोहित सुदाम ढमाले यांनी या गटातील जि. प. प्राथमिक शाळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक मेळावा आयोजित केला होता. या शिक्षक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार होते. या मेळाव्यासाठी तालुका गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, जि.प. सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, पं.स. सदस्य विशाल तांबे, रंजना काळे, जालिंदर पानसरे, शिक्षणविस्तार अधिकारी सुनंदा डुंबरे, केंद्रप्रमुख डी. डी. भांगे, प्रा. शिक्षक संघटना पुणे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे, राज्य सल्लागार संजय डुंबरे, तालुकाध्यक्ष उपेंद्र डुंबरे उपस्थित होते.प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून समस्या आढावा मेळाव्याचे उद्घाटन केले. शिक्षक बदलीला घाबरतो; परंतु त्यांना दिलासा देणारा निर्णय झाला आहे. त्या शिक्षकांकडे वाहने नाही. रस्ते नाहीत या समस्यांचा सहानुभूतीने विचार करू, असे अध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले. (वार्ताहर)शासनाने शिक्षकांसाठी जो जी.आर. काढला आहे; त्यामुळे शिक्षक हवालदिल झाला आहे. हा जाचक निर्णय समानीकरणाच्या बदल्या, आदिवासी भागात काम करणाऱ्या एकस्तर वेतनश्रेणी ३१ मार्चपूर्वी द्यावी. कोल्हेवाडी येथील शिक्षकांना जे विनावेतन केले आहे, त्यांच्या सेवापुस्तकातील लाल शेरा काढावा. जि.प. येणारे शैक्षणिक साहित्य येणे ते दर्जेदार असावे, अशा मागण्याही केल्या. मोहित ढमाले व विशाल तांबे यांनी या गटातील प्राथमिक शाळांच्या मागण्या इमारती व शैक्षणिक साहित्य गुणवत्ता यांची माहिती संकलित केली.- खंडेराव ढोबळे, सरचिटणीस, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना