नारायणपूर : पुरंदर किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा पुरंदर ग्रामपंचायत हद्दीत नारायणपेठ जवळ पुरंदर किल्ल्याचा लगत असलेला डोंगर कडा सोमवार रात्नी 7 वाजून 45 मिनिटांनी कोसळू लागला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्न शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुरंदर किल्याच्या पायथ्याला नारायणपेठ गाव आहे. तर वेताळ वस्ती हि घेरा पुरंदर हद्दीत येत आहे . ज्या ठिकाणी घटना घडली त्या वेताळवस्तीवर राहणारे बाबुराव जानू जानकर यांच्या घराच्या अगदी तीन चार फुठाच्या अंतरावरून वरून मातीचा राडा रोढा, दगड, पाण्याचा लोंढा आला घराच्या शेजारून रुद्र अवतार पाहून कुटुंबातील सर्वच घाबरून गेले. रात्नीची वेळ काळोख अंधार सर्वच जन घराबाहेर पाऊसात उभे होते खाली कोसळणारा राडा रोडा, पाणी, दगड जवळून जात होते.
आता काही खरे नाही असे म्हणत जानकर आपल्या प}ी, दोन मुलांसमवेत डोंगर कडा उतरत अंधा-या रात्नी अकरा वाजता नारायणपेठेमध्ये येऊन एका घरी मुक्काम केला. सदर घटना सांगितल्यानंतर सर्वच घाबरून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी प्रशासनाला कळविण्यात आले. घटनास्थळी माहिती अधिकारी एस. बी. इंगवले, तलाठी एन. एस. खरात, ग्रामसेवक एस.टी. बेलदार, कोतवाल रवींद्र अमराळे, माजी सरपंच बाळासाहेब डांगे आदी जणांनी पाहणी केली.
पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी धोकादायक ठिकाणच्या घरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले. तर प्रशासनाने
नोटीस काढून रहिवाश्यांना
सुरक्षित ठिकाणी जाण्यास
सांगण्यात आले मात्न रहिवाशी काही दुसरीकडे जाण्यास नकार देत होते. (वार्ताहर)
पाण्याचे स्नेत बदलल्याने घटना
4पुरंदर किल्यावर संरक्षण खात्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणचे पाण्याचे स्त्नोत बदलण्यात आले आहेत. नैसर्गिक ठिकाणी वाहणारे पाण्याचे स्त्नोत बंद करून ते एका जागी करून ते बिन्नी दरवाजा समोरून खाली सोडण्यात आला असल्याने हि घटना घडली असल्याचे येथील तरुण सागत आहे.
4तर किल्यावर जाणारा पायी रस्ता वाहून गेला. मोठ्या प्रमाणात भिंती वाहून गेल्या आहेत. याठिकाणी 25 ते 3क् भाताची खाचरे मातीच्या गाळणो भरून गेली आहेत. तर एक विहीर माती दगडाने भरून गेली आहे. भाताच्या रोपांचे नुकसान झाले आहे.
4 बाबुराव जानकर यांनी सांगितले कि माङो सर्वस्व मा•या घरापाशी आहे माझी जनावरे त्या ठिकाणी आहे आज मला दुसरीकडे जाण्यास सांगतात पण मी दुसरीकडे जाऊन काय करू मला दुसरा काही आधार नाही. मला काही दिवसाचे अन्न धन्य शासनाने पुरवावे, जनावरांच्या चा?्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
4 माजी सरपंच बाळासाहेब डांगे यांनी यावेळी सांगितले कि किल्यावर होणा?्या कामामुळे याठिकाणी आशा प्रकारच्या दुर्घटना घडू लागल्या आहेत.