शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

जुन्नरवासीयांना ‘गुड न्यूज’; यंदा कोणतीही करवाढ नाही!

By admin | Updated: February 24, 2015 23:03 IST

जुन्नरकरांसाठी एक गूड न्यूज आहे. आज सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही.

जुन्नर : जुन्नरकरांसाठी एक गूड न्यूज आहे. आज सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. नगर परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षाचे हे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांनी सांगितले.कोणतीही घरभाडे, पाणीपट्टी व इतर करांत वाढ झाली नाही. या अर्थसंंकल्पात ३३ कोटी ७० लाख रुपये जमा आणि २३ कोटी ८० लाख रुपये खर्चासह वर्षअखेरीस १० कोटी १० लाख रुपये शिल्लक दाखवण्यात आली आहे. यात प्राथमिक सोई-सुविधा अनुदानातून १ कोटी ५० लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून १ कोटी रुपये, रमाई आवास घरकुल योजनेतून ९० लाखांचा निधीचा समावेश करण्यात आला आहे. या वेळी घनकचरा प्रकल्प, मौलाना अबुल कलाम आझाद, सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करणे, राज वल्लभ जलतरण तलाव यासाठी भरीव तरतूद करावी, अशी सूचना नगरसेवक विकास खोपे यांनी केली. त्यास नगरसेविका जयश्री बावबंदे यांनी अनुमोदन दिल्यानंतर शिलकी अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले.या वेळी मुख्याधिकारी संतोष वारुळे, उपनगराध्यक्षा माधुरी जोगळेकर, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, अनिल मेहेर, नगरसेवक विकास खोपे, शिवसेना गटनेते मधुकर काजळे, जमीर कागदी, फिरोज पठाण, माजी नगराध्यक्षा किशोरी होगे, भारती मेहेर, सुजित परदेशी, अविनाश कर्डिले, अविन फुलपगार, शाम पांडे, बावबंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.हा अर्थसंकल्प जुन्नरवासीयांना दिलासा देणारा असला तरी कोट्यवधी रुपयांच्या अर्थसंकल्पाची बैठक अवघ्या तीन मिनिटांत उरकून सत्ताधारी राष्ट्रवादीने जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला.चर्चा करण्यात आली असती तर शहराच्या उत्पन्नात भर घालणारे अनेक निर्णय घेता आले असते, असे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शाम पांडे यांनी सांगितले. (वार्ताहर)