शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चांगली रुग्णालये ही काळाची गरज

By admin | Updated: December 22, 2016 02:18 IST

रुग्णसेवा हा आपल्याकडे मोठा प्रश्न आहे़ गरजू रुग्णांपर्यंत अत्याधुनिक सोयीसुविधा पोहोचणे अत्यावश्यक आहे़ चांगली रुग्णालये

पुणे : रुग्णसेवा हा आपल्याकडे मोठा प्रश्न आहे़ गरजू रुग्णांपर्यंत अत्याधुनिक सोयीसुविधा पोहोचणे अत्यावश्यक आहे़ चांगली रुग्णालये ही काळाची गरज असून, ती उभारणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले़मुकुंद माधव फाउंडेशनच्या वतीने शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलला ८० लाख रुपयांची अत्याधुनिक साधनसामग्री देण्यात आली़ परांजपे स्कीमच्या वतीने पोलीस हॉस्पिटलच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले़ त्याच्या उद्घाटनाप्रसंगी बापट बोलत होते़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, फिनोलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश छाब्रिया, फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त रितू छाब्रिया, शंशाक परांजपे, देवयानी हॉस्पिटलचे डॉ़ श्रीरंग लिमये, संजय आयशर हे उपस्थित होते़. पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या हॉस्पिटलसाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. समाज आणि पोलीस यांच्यातील दरी रुंदावत जाणे, हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही़ पोलिसांची केवळ संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही, तर गुणात्मक वाढही झाली पाहिजे़ त्यासाठी पोलीस शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे़.- गिरीश बापट, पालकमंत्रीशिवाजीनगर येथील या पोलीस हॉस्पिटलची अवस्था पाहून खूप दु:ख झाले होते़ त्याचे नूतनीकरण करण्याचा विचार सहकाऱ्यांशी बोलून दाखविला़ ही अत्याधुनिक उपकरणे चालविण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ नाहीत़ शासन ते देईपर्यंत हे हॉस्पिटल चालविण्याची जबाबदारी देवयानी हॉस्पिटलचे डॉ़ श्रीरंग लिमये यांनी घेतली आहे़ या सर्वांच्या सहकार्याने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्य सुविधा देण्याचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे़ - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्तमनावर घेतले, तर कोणतेही काम किती जलद होऊ शकते, याचे पोलीस हॉस्पिटल हे एक उदाहरण आहे़ तीन आठवड्यंत हे अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहिल्याचे प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले़