शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेड्या तरुणाचे भारतभर ‘सोनेरी चतुर्भुज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:22 IST

महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली.

पुणे : महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये तब्बल ४० दिवसांत १२ राज्यांतून हा सायकल प्रवास पूर्ण करत सहा हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केलेआहे.पुण्यातून सुरू झालेली ही सायकल जनजागृती फेरी चेन्नई-कोलकाता- दिल्ली-मुंबई-पुणे अशी सोनेरी चतुर्भुज झाली. या रॅलीचा समारोप गुरुवारी पुण्यातील सेनापती बापट रोड येथे करण्यात आला. प्रीतेशने ही मोहीम काही मित्रांच्या मदतीने आणि स्वखर्चाने केलीआहे.हा उपक्रम पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने केला आहे. १ आॅक्टोबरपासून पुण्यातील एसबी रोड येथून सायकल फेरीला सुरुवात झाली. देशात महिलांवरील अत्याचार, महिला सक्षमीकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे. या सर्व गोष्टींना आळा कसा घालावा, यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवत असतो. मात्र, पुण्यात यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाºया या धडपड्या तरुणाने फक्त चर्चांमध्ये भाग न घेता प्रत्यक्ष स्वत: रस्त्यावर उतरून समाजात जनजागृती व्हावी, यासाठी सायकल फेरी सुरू केली आहे.या मोहिमेमध्ये सायकल फेरीचा मार्ग पुणे-कोल्हापूर - हुबळी - बेंगलोर -चित्तोर - चेन्नई - नेल्लोर -भीरमुनिपतिनंम - कोरलम -कृष्णप्रसाद (ओडिसा) - मलिपूर -कोलकता - झारखंड -औरंगाबाद (बिहार) - वाराणसी - कानपूर -आग्रा - नोइडा - दिल्ली - राजस्थान - अहमदाबाद - सुरत - मुंबई -लोणावळा - पुणे अशा जवळपास १२ राज्यांच्या महत्त्वाच्या शहरांमधून तब्बल सहा हजार किलोमीटर एवढ्या अंतराचा एकूण प्रवास केला आहे. या मोहिमेमध्ये त्याने दररोज जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते.या मोहिमेबाबत प्रीतेश क्षीरसागर म्हणाला, ‘या मोहिमेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्याविरोधातील लढा, महिलांचे सक्षमीकरण या विषयांबरोबरच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरणाचाही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये या मोहिमेचे चांगले स्वागत केले आहे. आगामी काळातही सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अशाच सोशल विषयांवर मोहिमा राबविणार आहे.’