राजुरी : बांगरवाडी येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट कॉलेज आॅफ इंजिनअरिंगच्या विद्यार्थ्यांनी गोकार्ट रेसिंग कार बनवली आहे, अशी माहिती प्राचार्य अण्णासाहेब गोजे यांनी दिली.बांगरवाडी येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये झालेल्या एलाईट टेक्नो ग्रुप आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यालयात गोकार्ट डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोकार्ट रेसिंग कार बनवली आहे.कारसाठी लागणारे सॉफ्टवेअर सॉलिड वर्कर्स ड्रॉइंग शिट्स ड्राफ्टिंग मटेरिअल, त्याचप्रमाणे वेल्डिंग मशिन ड्रिलिंग मशिन, कटिंग ग्राइंडिंग मशिन, आदी प्रकारच्या मशिनरीचा वापर करून कार बनवली आहे. तसेच एक मि.मी. जाडीचा पत्रा वापरून गाडीचे विविध भाग बनवले आहेत. यामध्ये ट्यूबलेस टायर, डिस्कब्रेक, आॅटोमॅटीक क्लच, १२५ सी.सी.चे पेट्रोल इंजिन, स्पिरिट लेव्हलर, अँगल मोजणारे साहित्य, आदींचा वापर केला आहे. फॉर्म्युला वन रेसिंग कारचे वजन २०० किलो असते. ही कार सर्वात कमी वजनाची कार म्हणून ओळखली जाईल. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, राहुल रंजन, पुष्पेंदर सिंग, अतिश माथुर, माऊली शेळके, वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी बनवली गोकार्ट रेसिंग कार
By admin | Updated: April 5, 2016 00:52 IST