शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्य गाठण्यासाठी उडाली तारांबळ

By admin | Updated: April 1, 2015 04:58 IST

प्राप्तिकर आणि मिळकत कर भरण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांची मोठी धांदल सुरू होती. दंड टाळण्यासाठी कोणत्याही स्थितीत बिल भरणा करण्यासाठी सर्वच जण

पिंपरी : प्राप्तिकर आणि मिळकत कर भरण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांची मोठी धांदल सुरू होती. दंड टाळण्यासाठी कोणत्याही स्थितीत बिल भरणा करण्यासाठी सर्वच जण कार्यालय गाठत होते. वर्षभराचा व्यवहार पूर्ण करण्यात बॅँकेचे कर्मचारी व्यस्त होते. दुसरीकडे वर्षाचा कोटा पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धडाका कायम ठेवत मोठी वसुली केली. आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपते. यापूर्वी वर्षभरातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यावर सर्वांचा भर असतो. एक दिवस जरी विलंब झाला, तरी मोठा दंड भरावा लागतो. हे टाळण्यासाठी सर्वांची काल सोमवारपासून लगबग सुरू होती. आज मंगळवारी तर कोणत्याही स्थितीत आयकर आणि मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी संबंधित कार्यालयात गर्दी केली होती. आकुर्डीतील आयकर कार्यालयात उत्पन्न कर भरण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोकरदार, व्यावसायिकांची आणि करसल्लागारांची लगबग सुरू होती. यासाठी शहरातील विविध बॅँकांत स्वतंत्र खिडकीची सोय केली होती. यामुळे रात्री ८पर्यंत काही बॅँका खुल्या होत्या. तसेच, अनेकांनी आॅनलाईन कर भरण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. मिळकत कर भरण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातील कर संकलन विभागात नागरिकांची गर्दी होती. काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. दंड आणि जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी कर भरण्यास पसंती दिली. ‘कर भरा आणि जप्ती टाळा,’ असे स्पिकरवर सांगत अखेरच्या दिवशी मंगळवारीही महापालिकेच्या रिक्षा शहरात फिरत होत्या. वर्षभरातील व्यवहाराच्या नोंदी पूर्ण करण्याची धांदल बॅँक कर्मचाऱ्यांची सुरू होती. बॅँका खुल्या असूनही आज दैनंदिन व्यवहार झाले नाहीत. मात्र, अंतर्गत नोंदी आणि ताळेबंद पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे काम दिवसभर सुरू होते. त्यामुळे कार्यालयात काम सुरू असतानाही तणावपूर्ण शांतता दिसत होती. आपले व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी काही ग्राहक बॅँक व्यवस्थापकांकडे तगादा लावताना दिसत होते. बॅँक कर्मचारी व्यस्त असल्याने काही एटीएम केंद्रात रक्कम नसल्याचे चित्र शहरात दिसले. सलग सुट्यांमुळे नागरिकांनी एटीएममधून रक्कम काढल्याने केंद्रावर ताण वाढला. त्यामुळे मंगळवारी काही एटीएम केंद्रातील रक्कम सकाळीच संपली. त्यामुळे ती बंद होती. रक्कम काढण्यासाठी नागरिकांना केंद्र शोधण्याची वेळ आली. (प्रतिनिधी)