शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

प्रमाणपत्रांचा गोरखधंदा

By admin | Updated: June 6, 2016 00:29 IST

निवडणूक महापालिकेची असो की, विधानसभा, लोकसभेची; बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत होते. त्याचा प्रत्यय शनिवारी आनंदनगरमध्ये आढळून

पिंपरी : निवडणूक महापालिकेची असो की, विधानसभा, लोकसभेची; बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत होते. त्याचा प्रत्यय शनिवारी आनंदनगरमध्ये आढळून आलेल्या विविध प्रकारच्या बनावट प्रमाणपत्रांमुळे आला. याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने स्टिंग आॅपरेशन केले असता कोणत्याही शासकीय कार्यालयात रीतसर कागदपत्र जोडून अर्ज दाखल न करता, घरच्या घरी तयार केलेली बनावट प्रमाणपत्र वितरित केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बनावट प्रमाणपत्र केवळ पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरातील कार्यालयांचे नाही, तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील प्रमाणपत्र एजंटकडून तयार करून दिले जाते. जात प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दल कोणी आक्षेप घेतला, तरच सखोल चौकशी होऊन त्यावर निर्णय घेतला जातो. अन्य ठिकाणी तर सर्रास अशा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सवलतींचा लाभ उठविला जात आहे. बनावट प्रमाणपत्र तयार करणारे काही ठग पोलिसांच्या जाळ्यात अडकले जात असले, तरी त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असतो. राजकीय पुढाऱ्यांपैकी काहीजण असे उद्योग करून पुढील निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने बनावट प्रमाणपत्र, तसेच अन्य कागदपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. बनावट जात प्रमाणपत्र दाखल करून महापालिकेची निवडणूक लढविण्याचे अनेक प्रकार शहरात घडले आहेत. जात दाखले, तसेच जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे उघडकीस आल्यानंतर नगरसेवकपद रद्द झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना, या प्रकारावर नियंत्रण आणण्यात शासकीय यंत्रणेला यश आलेले नाही. शाळेच्या दाखल्यापासून, उत्पन्न दाखला, जन्म-मृत्यूनोंदणी, जात प्रमाणपत्र अशी महत्त्वाची प्रमाणपत्रे सहज मिळू लागली आहेत. २००९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या वेळी गांधीनगर झोपडपट्टीत एका कार्यकर्त्याकडे हजारोंच्या संख्येने रेशनकार्ड आढळून आली. घरच्या घरी बनावट रेशनकार्ड तयार करून बोगस मतदानासाठी ती वापरण्याचे नियोजन होते. (प्रतिनिधी)सूत्रधाराला उस्मानाबादमध्ये अटक चिंचवड पोलिसांनी सापळा रचून शनिवारी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दिनकर लिंबाजी म्हस्के (वय ४९, रा. आनंदनगर, चिंचवड) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयात बनावट प्रमाणपत्रांचा ढीग आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या प्रकरणातील सूत्रधार बनसोडे याला उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. म्हस्के याच्या कार्यालयातून लॅपटॉप, विविध कार्यालयांचे शिक्के, तसेच छापील प्रमाणपत्र असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कार्यालयात सुमारे ४०० दाखले आढळून आले. आणखी किती बनावट प्रमाणपत्र वितरित केली याचा तपास पोलीस करत आहेत. शिक्के कोठून मिळविले ?बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिनकर म्हस्के याच्या आनंदनगर कार्यालयात विविध शासकीय कार्यालयांचे रबरी शिक्के आढळून आले. ते शिक्के त्यांनी कसे तयार केले, कोणाकडून तयार करून घेतले, याचाही शोध पोलीस घेत आहेत. बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्यांचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे. ज्यांनी अशा एजंटांकडून दाखले घेतले असतील, ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.