शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘नो कॅश’चे झळकले फलक

By admin | Updated: November 14, 2016 06:54 IST

शहरातील बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पुणेकरांचा रविवार कोणत्या एटीएम सेंटरमध्ये पैसे मिळतात, हे

पुणे : शहरातील बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पुणेकरांचा रविवार कोणत्या एटीएम सेंटरमध्ये पैसे मिळतात, हे शोधण्यातच गेला. अनेक ठिकाणी फिरून हे नागरिक हैराण झालेले दिसत होते. बँकांच्या हेल्पलाइनवर प्रतिसाद येत नसल्याने या हैराणीत अधिकच वाढ झाली.

एटीएमसमोर नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षक नसल्याचे चित्र होते. अनेकदा पैशांसाठी आत गेलेल्या नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बूज राखत स्वत:वर संयम ठेवला. कसबा पेठेतील नवग्रह मंदिराजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी दुपारी ४ वाजता करण्यात आलेला नोटांचा भरणा तीन तासांतच संपला. ‘नो कॅश’ अशी सूचना लिहिलेली असूनही रविवारी सकाळपासून अनेकदा ग्राहकांनी पैसे मिळतात की नाही, याची चाचपणी केली. आनंदनगरमधील सनसिटी स्टॉपजवळील स्टेट बँकेच्या केंद्रात रात्री पैसे भरल्याचे समजल्यावर स्थानिक नागरिकांनी पैसे घेण्यासाठी रांग लावली; मात्र पैसेच बाहेर येत नव्हते. बँकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतरही थंड प्रतिसादामुळे नागरिकांचा संताप झाला.बाजीराव रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या इमारतीमधील केंद्रात अनेक एटीएम मशिन्स असल्याने नागरिकांनी आशेने अनेकदा आत जाऊन चाचपणी केली; मात्र दुपारी अडीचपर्यंत सर्व केंद्रे बंदच होती. प्रभात रस्त्यावरील आयसीआयसीआय, अप्पा बळवंत चौकातील एचडीएफसी या बँकांची केंद्रे बंदच होती. कॅम्प भागातील पंजाब नॅशनल बँकेचे केंद्र व भांडारकर रस्त्यावरील फेडरल बँकेचे केंद्र यासमोर मोठ्या रांगा होत्या. बँकांच्या शाखा खुल्या असल्याने अनेकांनी तो पर्याय अवलंबला. धायरीतील स्टेट बँकेच्या शाखेत सकाळपासून गर्दी होती. रमणबाग शाळेजवळील एचडीएफसी बँकेबाहेर असलेल्या रांगेचे व्यवस्थापन केले जात असल्याने पंधरा ते वीस मिनिटे रांगेत थांबून सुटे पैसे मिळालेल्या नागरिकांमध्ये समाधान होते.