शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तेरा गावांना कळमोडीचे पाणी द्या

By admin | Updated: May 3, 2017 01:59 IST

शिरूर तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या १३ गावांतील शेतीसाठी लाभदायक असणारे कळमोडी धरणाचे २ टीएमसी

कान्हुरमेसाई : शिरूर तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या १३ गावांतील शेतीसाठी लाभदायक असणारे कळमोडी धरणाचे २ टीएमसी पाणी मिळण्यासाठी पाबळ, धामारी, थापेवाडी, पिंपळवाडी, खैरेनगर, हिवरे, मांदळेवाडी, खैरेवाडी, कान्हुरमेसाई, चिंचोली मोराची, डफळापूर, मिडगुलवाडी, शास्ताबाद या १३ गावांसाठी मिळावे, याकरिता नुकतीच एक बैठक चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील खंडोबा मंदिरात आयोजिण्यात आली होती.या परिसरातील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त शेतकरी हजर होते. या बैठकीत कळमोडीचे उर्वरित २ टीएमसी पाण्यावर या बारा गावाचा अधिकार आहे आणि ते आम्हाला मिळाले पाहिजे, असे शेतकऱ्यांनी या बैठकीत सांगितले. आमच्या परिसरातील कायम दुष्काळी असणाऱ्या १० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणे गरजेचे असताना या १२ गावांच्या पाण्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. हे धरण अडीच टीएमसी पाणी या १३ गावांकरिता मिळण्यात यावे. या धरणातून पहिल्यांदा नवीन पाणी उपसा योजनेद्वारे वेळ नदीत सोडण्याचा मूळचा आराखडा आहे. त्यातून हे पाणी आंबेगाव व शिरूर तालुक्यातील जिरायती शेतीला मिळणार आहे, तसेच हे पाणी शिरूर तालुक्यातील थिटेवाडी बंधाऱ्यात आल्यानंतर शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरातील कायम दुष्काळी परिसरातील गावे ओलिताखाली येणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र तसे घडता अद्यापही गावे दुष्काळी छायेतच दिसून येत आहेत.या परिसरातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर १ जूनपासून या परिसरातील शेतकरी संपावर जाण्याचा इशारा, तसेच येथून पुढे येणाऱ्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी व कार्यकर्त्यांनी केला आहे.या वेळी जि. प. सदस्या स्वातीताई पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य आबासोा कोहकडे, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष दत्ताशेठ पाचुंदकर, चिंचोली मोराचीचे माजी सरपंच स्मिताताई धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते यापूर्वी कळमोडीच्या पाण्याची मागणी केली असून, अनेक वेळा सर्व्हे करूनही अद्याप या परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांना शासनदरबारी न्याय मिळाला नाही. पाण्याच्या मागणीसाठी पाबळ येथील कालावधीमध्ये जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी कळमोडीचे पाणी या बारा गावांसाठी देण्याचे कबूल केले होते.काही किरकोळ भूसंपादन वगळता सध्या निवृत्ती नाणेकर, खैरेनगरचे सरपंच सीमाताई खैरे, रामदास मांदळे, संभाजी नाणेकर, बाजीराव उकिर्डे, राहुल नाणेकर, खैरेनगरचे माजी सरपंच रघुनाथ शिंदे, अप्पासोा खैरे, दौलतराव दळवी, दीपक तळोले, शहाजी दळावी, गोविंद नाणेकर, संजय खैरे, दत्ता पाटील नाणेकर, दादासाहेब खैरे, दत्तोबा गोडसे, पंढरीनाथ तांबे, सर्जेराव नाणेकर, बापूसोा ननवरे, उद्योगपती गुलाबराव धुमाळ आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती नाणेकर यांनी सूत्रसंचालन केले. रामदास मांदळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)जनरेटा उभारण्याची गरज : प्रकल्पाची घोषणाया प्रकल्पातून सुमारे १० हजार हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र नवीन पाणी योजना कोण करणार, या वादात या धरणातील पाणी अजूनही १३ गावांना मिळत नाही, याकडे लोकप्रतिनिधींनीही मौन रूप धारण केले आहे. या प्रकल्पासाठी जनरेटा उभारण्याची गरज आहे. कळमोडी धरण कार्यक्षेत्रातील शिरूर, आंबेगाव या तालुक्यातील हजारो एकर शेती पिढ्यान्पिढ्या जिरायती आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या राजवटीत १७ वर्षांपूर्वी कळमोडी धरण प्रकल्पाची घोषणा झाली होती व निधी साखर महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार दिलीपराव वळसे-पाटील यांनी रेटा लावला होता. त्यांच्या कार्यकाळात हे धरण पूर्ण झाले. पाण्यासाठी पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगावकरांची ओरडकेंदूर : चासकमान धरणातून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना गेले २८ दिवस होऊनही अद्याप मिळालेले नसून चासकमानसाठी पुनर्वसित केलेल्या जमिनी परत करा व पाणी देऊच नका, असा प्रश्न येथील शेतकरी नीलेश जगताप, उत्तम बेंडभर, मोहन टाकळकर, धर्मराज वाजे, शिवाजी जगताप, समाधान डोके, सागर शितोळे, अशोक नाईनवरे, अण्णा दौंडकर, शेखर तांबे यांनी केलेला आहे. चासकमान धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपाचे सोडण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. पाणीवाटप करण्यासाठी या भागातील प्रत्येक गावात पाणीवाटप संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मात्र या संस्था फक्त नावापुरत्याच अवलंबून असून चासकमान पाणीवाटपाच्या बैठका पालकमंत्री व आमदारांच्या उपस्थितीत मुंबई या ठिकाणी घेतल्या जातात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विचारात घेतले जात नाही. कालव्याचा टेलच अद्याप निश्चित करण्यात आलेला नसून केवळ राजकीय स्वार्थासाठी पुढारी पाणी पळवत असून या भागातील पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगाव खुर्द या गावांवर अन्याय होत आहे. या परिसरात चासकमानच्या धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते. मात्र, पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही पोलीस बंदोबस्तात ते खाली नेण्यासाठी पुढारी प्रयत्न करीत आहे.नागरिकांचा प्रतिसाद नाहीसंबंधित विभागातील कार्यकारी अधिकारी लोंढे यांना नागरिकांनी फोन केला असता त्यांना प्रतिसाद मिळत नाही. जमीन महसूल कायद्यानुसार प्रथम कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना पाणी देणे अपेक्षित असतानाही लाभक्षेत्रात नसतानाही काही भागात पाणी देण्यात येत असल्याने पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात  येणार असल्याचे शेतकरी  मोहन टाकळकर यांनी सांगितले.