शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडेबाजारासाठी पुण्यात जागा द्या

By admin | Updated: March 17, 2017 02:10 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ताजा शेतमाल आठवडेबाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना थेट विकता यावा, यासाठी मोठ्या गृहरचना संस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्या

पुणे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ताजा शेतमाल आठवडेबाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना थेट विकता यावा, यासाठी मोठ्या गृहरचना संस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्या, मैदाने उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना रास्त दाम मिळेल. या माध्यमातून एक तरी आत्महत्या रोखली जाईल, असे भावनिक आवाहन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी येथे केले.पुणे पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँकेतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना पुणे पीपल्स पुरस्कार देऊन देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. फुले पद्धतीची पगडी, १ लाख १ हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. गणेश कला, क्रीडा मंचामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे होते. नियोजित महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक स्मिता वस्ते यांच्यासह बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते, संचालक बबनराव भेगडे, विजयकांत कोठारी, जनार्दन रणदिवे आदी व्यासपीठावर होते. शीलाताई आढाव यांचाही गौरव या वेळी करण्यात आला.डॉ. आढाव यांनी त्यांच्या भाषणात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, हमालांना पत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यावर देशमुख म्हणाले, की देशातील ४८ कोटी कष्टकऱ्यांचे अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारकडून आपल्या परीने प्रयत्न केले जात आहेत. पुणेकरांनीही त्यामध्ये एक तरी काम केले पाहिजे. आठवडेबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास पुणेकरांनाही ताजा शेतमाल मिळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल. मैदाने आठवडेबाजारासाठी दिल्यास एक जरी आत्महत्या रोखली गेली, तर त्याचे श्रेय पुणेकरांना मिळेल.अशा बाजारांसाठी जागा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेशी यापूर्वी संपर्क साधल्याची पुस्ती जोडून देशमुख यांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयात ज्यांना जाता येत नाही, अशा गरजू रुग्णांसाठी पीपल्स बँकेने सहकार रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.डॉ. देखणे यांनी डॉ. आढाव यांच्या रुपाने विचारतत्त्वांचा, सामाजिक विचारांचा गौरव होत असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्राला संत परंपरा, लोककला, सुधारक आणि पुरोगामित्वाची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रारंभी लघुचित्रफितीद्वारे डॉ. आढाव यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. पीपल्स बँकेने अवयवदानाची मोहीम सुरू केल्याची माहिती सुभाष मोहिते यांनी प्रास्तविकात सांगितली. (प्रतिनिधी)