शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धान्य शिल्लक साठ्यातून सामाजिक संस्थांना द्या!

By admin | Updated: January 26, 2016 01:47 IST

जिल्ह्यातील २३ सामाजिक संस्थांना शासनाकडून कल्याणकारी योजनेत देण्यात येणारे धान्य आॅक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याने अनेक बालाश्रम,

पुणे : जिल्ह्यातील २३ सामाजिक संस्थांना शासनाकडून कल्याणकारी योजनेत देण्यात येणारे धान्य आॅक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याने अनेक बालाश्रम, वृद्धाश्रम व वसतिगृहातील मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन तातडीने सर्व संस्थांना शिल्लक धान्यसाठ्यातून पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले की, कल्याणकारी योजनेत धान्यपुरवठा करण्यात येणाऱ्या संस्थांना बुधवारपासून धान्यवाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेंतंर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृहे, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘आस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. यामुळे शहरातील २३ संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून हे स्वस्त धान्यच मिळालेले नाही. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासनाने केंद्र शासनाकडून धान्य येण्याची वाट न पाहता शिल्लक असलेल्या धान्यसाठ्यातून या संस्थांना धान्यपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.