शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

सहा महिन्यांचा अवधी द्या

By admin | Updated: February 10, 2015 01:32 IST

शहरातील कचराप्रश्नावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी मार्ग काढला जात आहे. ८ आॅक्टोबरनंतर उरुळी कांचन येथे कचरा टाकला जाणार नाही

पुणे : शहरातील कचराप्रश्नावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी मार्ग काढला जात आहे. ८ आॅक्टोबरनंतर उरुळी कांचन येथे कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी आज येथे दिले.भाजपच्या सदस्यत्व नोंदणी अभियानाची माहिती सांगण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. मोबाईलवरील एसएमएसद्वारे आजवर १ लाख ४३ हजार सदस्य नोंदणी झाली असून, ५ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे शहर भाजपचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीस दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५५४ बूथवर सदस्य नोंदणीचे अभियान राबविले जाईल, असे शिरोळे यांनी नमूद केले.शहरात कचरा जाळला जात असल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शिरोळे म्हणाले, की कचऱ्याबाबत गेल्या २५ वर्षांत नियोजन झाले नाही. कोथरूडचा कचरा डेपो तेथील नागरिकांच्या विरोधामुळे बंद केला गेला आणि उरुळी कांचनला नेऊन टाकला जाऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुणेकरच आहेत. पुण्याच्या सर्व प्रश्नांबाबत त्यांना पुणेकरांइतकीच आस्था आहे. म्हणूनच त्यांनी ८ जानेवारी रोजी या प्रश्नावर बैठक घेतली. उरुळी कांचनचे ग्रामस्थही हजर होते. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत त्यांनी मुदत मागितली आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा प्रश्न सोडविला जाईल. ८ आॅक्टोबरनंतर तेथे कचरा टाकला जाणार नाही, असा मी शब्द देतो. (प्रतिनिधी)