शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हक्काचे पाणी प्रकल्पग्रस्तांना द्या

By admin | Updated: April 11, 2016 00:37 IST

उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन

इंदापूर : उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन तासांवर आणलेला वीजपुरवठा आठ तास करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटी व उजनी धरणग्रस्त संवर्धन समितीच्या वतीने रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगराई येथील बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उजनी पाणलोट क्षेत्रातील सुमारे शंभर गावांमधील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अचानक वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील नळ पाणीपुरवठा योजना, पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप यंत्रे यांच्यासह शेतकऱ्यांचे लघुउद्योग अडचणीत आले आहेत. या संदर्भात ७ एप्रिल रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा. पुरेशा दाबाने आठ तास वीज मिळावी अशी मागणी करून दखल घेतली गेली नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. उजनी धरणग्रस्त संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष अंकुश पाडुळे यांचे भाषण झाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता सज्जाद शेख, रघुनाथ गोफणे यांच्या उपस्थितीत तहसीलदार वर्षा लांडगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, मंगेश पाटील, मुकुंद शहा, नगराध्यक्ष अशोक इजगुडे, भरत शहा, विलास वाघमोडे, दीपक जाधव, प्रमोद राऊत, उजेर शेख, ऋतुजा पाटील, माया विंचू, अलका ताटे आदींसह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. उजनी प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली जाईल. वीजकपात व इतर प्रश्न त्यांच्यासमोर मांडले जातील, असे हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी सांगितले.