शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

चुकून गळा आवळल्याने मुलीचा मृत्यू

By admin | Updated: October 3, 2015 01:05 IST

स्तनपान करीत असताना आईच्या साडीच्या पदराचा गळ््यावर दाब पडल्याने तीन दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

पुणे : स्तनपान करीत असताना आईच्या साडीच्या पदराचा गळ््यावर दाब पडल्याने तीन दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. जगताप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : दि. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित २२ वर्षीय विवाहिता गर्भवती असताना पतीसह तीनचाकी टेम्पोतून रुग्णालयात जात होती. मात्र, वाटेतच ती प्रसूत झाली. त्यानंतर ते दवाखान्यात न जाता मुलीला घरी घेऊन आले. दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता मुलगी खूप रडू लागल्याने आईने दूध पाजून तिला झोपवले. त्यानंतर दोन तासांनी ही मुलगी बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. या वेळी पुढील तपासासाठी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला होता.त्या वेळी सहकारनगर पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंंद करण्यात आली होती. ससून रुग्णालयाकडून राखून ठेवलेल्या व्हिसेराचा अहवाल पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी प्राप्त झाला. या अहवालामध्ये तीन दिवसांच्या मुलीचा गळ््यावर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. स्तनपान करीत असताना मुलीच्या गळ््याभोवती आईच्या पदराचा दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार मुलीच्या आईवर कलम ३०४ अअन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.