शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'गिरीवन'वासीयांच्या नशिबी वनवासच

By admin | Updated: May 9, 2014 08:51 IST

माजी खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या मुलाने सुरू केलेली कंपनी म्हणून मोठय़ा विश्‍वासाने पैसे गुंतवून जमीन खरेदी केलेल्या गिरीवन या प्रकल्पातील खरेदीदारांच्या नशिबी २४ वर्षांपासून वनवासच आला आहे.

पुणे : माजी खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या मुलाने सुरू केलेली कंपनी म्हणून मोठय़ा विश्‍वासाने पैसे गुंतवून जमीन खरेदी केलेल्या गिरीवन या प्रकल्पातील खरेदीदारांच्या नशिबी २४ वर्षांपासून वनवासच आला आहे.निवृत्तीनंतरचे आयुष्य निवांतपणे व्यतीत करण्यासाठी जवळची सर्व पुंजी खर्ची घातलेल्या या ज्येष्ठ नागरिकांवर आता कोर्टकचेर्‍या करण्याची वेळ आली आहे. पोलिसांपासून ते महसूल यंत्रणेपर्यंत कोठूनही न्याय मिळत नसल्याने खरेदीदार अडचणीत सापडले आहेत. नि:स्पृह आणि समाजासाठी आयुष्य वेचणारे रामभाऊ म्हाळगी यांचे पुत्र जयंत आणि स्नुषा सुजाता म्हाळगी यांनी १९८९ मध्ये 'सुजाता फार्म्स' ही कंपनी स्थापन केली. मुळशी तालुक्यातील होतले व डोंगरगाव येथे 'गिरीवन हिल स्टेशन' प्रकल्पाची सुरुवात केली. रामभाऊ म्हाळगी यांच्यावरील विश्‍वासापोटी अनेकांनी येथे जमिनी खरेदी केल्या. अनेकांनी तर नवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम त्यात गुंतविली. त्याप्रमाणे त्यांना जागाही दाखविण्यात आल्या. मात्र, अनेक वर्षांनंतरही जमिनी नावावर होत नसल्याने खरेदीदारांना धक्काच बसला. त्याचे कारण विचारले असता शासकीय नियमाप्रमाणे शेतकरी असलेल्यांनाच जमीन खरेदीचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या प्रकारची कोणतीही अडचण येणार नसल्याचे 'सुजाता फार्म्स'कडून सांगण्यात आले होते. कागदोपत्री नावावर नसली, तरी जमीन आपलीच असल्याने तेथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या खरेदीदारांना रस्त्यावरून जाऊही दिले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. फसवणूक झालेल्या 'गिरीवन प्लॉट ओनर्स असोसिएशन'चे के. डी. वेलणकर यांच्यासह अनेक खरेदीदारांनी 'लोकमत'कडे आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, ''सुमारे ८५0 जणांनी या ठिकाणी प्लॉट घेतले आहेत. मात्र, त्यांची विक्री करताना कंपनीने सरकारी मोजणी केलेली नाही. या भूखंडावर जाण्यासाठी कंपनीने वहिवाटीचा रस्ता कंपनीच्या खर्चातून बनवून घेतला. हा रस्ता जमीनमालकांच्या हद्दीतून जातो. त्याची मालकी जमीनधारकांची असून, तो सार्वजनिक रस्ता असल्याचा निकालही न्यायालयाने दिला आहे. तरीही एखादा जमीनमालक आपल्या जमिनीवर जाऊ लागला, तर त्याला मज्जाव केला जातो. याविरुद्ध पौंड पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांनी कंपनीला व जयंत म्हाळगी यांना नोटीसही काढली होती.'' तरीही अजूनही स्वत:च्याच जमिनीवर जाण्यास आम्हास आडकाठी केली जात असल्याचे वेलणकर म्हणाले. याबाबत जयंत म्हाळगी यांच्या प्रतिनिधींनी सांगितले, की प्लॉटधारकांच्या जागा त्यांच्या नावावर होण्याची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांकडे प्रलंबित आहे. त्यासाठी आवश्यक बाबी प्लॉटमालकांनीच पूर्ण करणे आवश्यक आहेत. प्लॉटधारकांच्या मागणीनुसारच सुरक्षा ठेवण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कोणालाही अडविले जात नाही. येणार्‍या-जाणार्‍यांची नोंद करण्यासाठी थांबविले जाते. (प्रतिनिधी)

संशयास्पद व्यवहारकोणतीही कंपनी ही बिगर शेतकरी असल्याने शेतजमिनीचा व्यवहार करू शकत नाही, या कायद्याला 'सुजाता फार्म्स'ने 'ट्रेड मार्क क्लास ३६'ने बगल दिली. या कायद्याप्रमाणे बँक किंवा सावकारी पद्धतीने व्यवहार केले जातात. त्याप्रमाणे कंपनीने विशिष्ट शेतकर्‍यांना १00 टक्के कर्जे दिली आणि सावकारी पद्धतीने शेतजमिनी शेतकर्‍यांकडून गहाणखत करून घेतल्या. या पद्धतीने वारंवार कर्जे देऊन सुमारे २00 एकर जमीन घेतली गेली आहे.