शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडी, एरंडवणा, कोथरूड घरांसाठी सर्वाधिक महागडे

By admin | Updated: December 26, 2014 04:56 IST

शहराच्या विविध भागांत सदनिकांचे दर गगनाला भिडले असतानाच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात सरासरी

पुणे : शहराच्या विविध भागांत सदनिकांचे दर गगनाला भिडले असतानाच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात सरासरी २० टक्के दरवाढीची शिफारस केली आहे. ही दरवाढ मंजूर झाल्यास १ जानेवारी २०१५ पासून घरांच्या किमती अधिक महागणार आहेत. या प्रस्तावित दरवाढीत घोरपडी परिसरातील सदनिका शहरात सर्वांधिक महाग असणार आहेत. घोरपडी परिसरात प्रतिचौरस फूट १२ हजार ९१५ रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने गेल्या एक-दोन वर्षांतील सदनिका व अन्य मिळकतीचा खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेऊन रेडीरेकेनरचे दर निश्चित करण्यात येतात. यासाठी शहराचे ५५ विभाग (झोन) तयार करण्यात आले आहेत. त्या विभागातील मोकळ्या जागा आणि सदनिकांचे कमाल व किमान दर सुचविण्यात आले आहेत. घोरपडीपाठोपाठ एरंडवणा आणि कोथरूडने त्यानंतर क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये घोरपडी परिसरासाठी १२ हजार ९१५, एरंडवणा ११ हजार ८९२, कोथरूड १० हजार २९६ प्रतिचौरस फूट दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरात सर्वांत कमी दर ३ हजार ६०३ चौरसफूट दर शिवणे परिसरात आहे. तर मोकळ्या जागांमध्ये सदाशिव, नारायण पेठ परिसरात सर्वांधिक दर सुचविण्यात आले आहेत. नारायण पेठेत दर प्रतिचौरस फुटासाठी ८ हजार २४८ रुपये आणि सदाशिव-नवी पेठेत ७ हजार ८१५ , बुधवार पेठ परिसरात ७ हजार ६२८ दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुद्रांक विभागाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेडीरेकनरमध्ये सरासरी २० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. परंतु बांधकाम व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधीने या दरवाढीला विरोध केला असून, ही दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. येत्या १ जानेवारी २०१५ पासून रेडीरेकनरचे दर लागू होणार आहेत.(प्रतिनिधी)