शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गझलचे भावविश्व काळजाला भिडणारे

By admin | Updated: March 1, 2016 01:36 IST

धार्मिक संघर्ष, माणसांची वजाबाकी नष्ट करीत गझलेने वैश्विक ऐक्य निर्माण केले आहे. कलात्मक जाणिवांची लोकशाही निर्माण करणारी

पुणे : धार्मिक संघर्ष, माणसांची वजाबाकी नष्ट करीत गझलेने वैश्विक ऐक्य निर्माण केले आहे. कलात्मक जाणिवांची लोकशाही निर्माण करणारी, मराठी वाङ्मय संस्कृतीला झळाळी देणारी, सांस्कृतिक संचिताचे वैभव वाढवणारी गझल काळजाला भिडते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विसंवाद आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्वाणीच्या वाटेवर अभिव्यक्त होणारी गझल ही मूल्यात्मक मांडणी आणि शब्दांच्या महिरपीतून व्यक्त होते, असे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. प्रेरणा आर्ट फाउंडेशन आयोजित गझलकारा मीना शिंदे यांच्या ‘कातर वेळी’ या गझलांच्या अल्बमचे प्रकाशन श्रीपाल सबनीस व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गझलकार इलाही जमादार, अनिल कांबळे, संजय शिंदे, मीना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, की कोणते सूर, स्वर आणि शब्द यांचा मिलाफ कोठे होईल, हे सांगता येणार नाही. स्वर-शब्दांची भेट ही योगायोगावर अवलंबून असते. हे माझे शेवटचे गाणे, अशी भावना ठेवून प्रत्येक गाण्याकडे, कवितेकडे पाहिले, तर सर्वोत्तम कलाकृती जन्माला येते. स्वत:ची साधना करतानाचा दुसऱ्याच्या कवितेवर प्रेम करणारा कलाकारच खऱ्याखुऱ्या कवितेवर प्रेम करणारा असतो. गाणे अथवा कविता घडतानाचा क्षण सर्वांत सुंदर असतो. आतील सुरांची भेट होऊनच गाणी घडतात. मीना शिंदे म्हणाल्या, ‘‘मूक झाले शब्द माझे, साथ त्यांनी सोडली, भावना माझ्या मनाची, आसवे का बोलली’ अशी माझी आज अवस्था झाली आहे. गझलांमधून आयुष्याचा खरा अर्थ उलगडत जातो. त्यामुळेच गझलांमधील कल्पनाविलास, व्याप्ती मन व्यापून टाकते.’’ डॉ. मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केले.