शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मैदान खासगी संस्थेला देण्याचा घाट

By admin | Updated: February 5, 2016 01:51 IST

महापालिकेचे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम व्यावसायिक क्रिकेट अकादमीस भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे.

मिलिंद कांबळे,  पिंपरीमहापालिकेचे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम व्यावसायिक क्रिकेट अकादमीस भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. आर्थिक उत्पन्नवाढीसाठी हे केले जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिक आणि खेळाडंूना मैदानात प्रवेशच मिळणार नसल्याने खेळास चालना देण्याचा मूळ हेतूला हरताळ फासला जाणार आहे. महापालिकेचे १९९२ पासून स्टेडिअम देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सुरक्षारक्षक, ग्राउंडमन आणि इतर कामांसाठी लाखो रुपये खर्च प्रतिमहिना आहे. मैदानास ३०० रुपये प्रति दिवस भाडे आहे. त्याद्वारे नऊ हजार रुपये उत्पन्न मिळते. तुलना केली असता खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत असून, महापालिका तोट्यात आहे. त्यातच जकात आणि एलबीटी बंद झाल्याने क्रीडा विभागाच्या खर्चावर मर्यादा आली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. मैदान २५ वर्षे दीर्घकालीन भाडेकरार तत्त्वावर देण्यासंदर्भात एका खासगी क्रिकेट अकादमीचा प्रस्ताव आला आहे. संपूर्ण मैदानाची देखभाल आणि दुरुस्ती अकादमी करणार असून, त्या मोबदल्यात दरमहा ३० हजार रुपये उत्पन्न महापालिकेस दिले जाणार आहे. नवोदितांना क्रिकेटचे सशुल्क प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. काही क्रीडा पर्यवेक्षक, अधिकारीच यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. मात्र, एकदा का मैदान खासगी अकादमीच्या ताब्यात गेले की, स्थानिकांना मैदानात प्रवेश दिला जात नाही. हे सत्य आहे. पुणे आणि शहर परिसरात प्रति दिनी ३ ते १० हजार रुपये भाडे आहे. या पद्धतीने अधिक शुल्क आकारणी करून संस्था व्यावसायिक हेतू साध्य करू शकते. परिणामी सर्वसामान्यांना मैदानात प्रवेश कायमचा बंद होणार असल्याचे स्थानिक खेळाडूंनी सांगितले. महापालिकेचा एक पैसाही खर्च न होता खासगी संस्था मैदानाची देखभाल आणि दुरुस्ती करणार असा प्रस्ताव होता. मोबदल्यात ठरावीक उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे. तसेच, खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मैदानाबाहेरील जॉगिंग ट्रॅकचा वापर नागरिकांना करता येईल. शहरातील अनेक भागांत छोटी-मोठी मैदाने आहेत. ती सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत रिकामी असतात. त्या काळात ती खासगी शाळा व महाविद्यालयांस वापरण्यास देता येतील. स्टेडिअमवर वर्षाला १५ ते १६ लाखांचा खर्च होतो. त्यात बचत होणार आहे. - समीर मासूळकर, सभापती, क्रीडा समितीतसा काही प्रस्ताव अजून प्राप्त झालेला नाही. स्टेडिअमला वर्षभरात मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची माहिती घेतली जात आहे. त्याची तुलना केली जाणार आहे. क्रीडा सभापती समीर मासूळकर यांनी खासगी अकादमीस मैदान भाड्याने देण्यासंदर्भात विषय मांडला होता. मात्र, प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यास विचार केला जाईल.- दत्तात्रय फुंदे, क्रीडा विभाग