शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘सरल’ला मिळेना ‘आधार’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 03:44 IST

‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या

पुणे : ‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या नावांत बदल अशा विविध तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. माहिती भरण्यासाठी आता केवळ चार दिवस उरल्याने काही शिक्षक संघटनांनी या वर्षी ‘सरल’साठी आधार बंधनकारक करू नये, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’ प्रणालीमध्ये भरण्याची लगबग सध्या सर्वच शाळांमध्ये आहे. दररोज दोन-तीन शिक्षकांना हेच काम करावे लागत आहे. माहिती न भरल्यास संच मान्यतेसाठी शाळांना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे शिक्षकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. मात्र, ही माहिती भरताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यातच या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या अडचणींमध्ये भर पडली आहे. यापूर्वीच शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या वेळी अद्ययावत केली जात आहे. हीमाहिती अद्ययावत करताना आधार कार्डवरील माहिती व आधीच माहिती याची खातरजमा करूनच भरावीलागत आहे.मात्र, काही विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख, वडलांचे नाव आणि यापूर्वी सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीमध्ये काहीसा बदल आढळून येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’मध्ये भरली जात नाही. तर काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने त्यांची माहिती भरणे अशक्य आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्डसाठी नोंदणी केल्याची पावती आहे. मात्र, त्याआधारे ‘सरल’मध्ये माहिती भरण्यातही शिक्षकांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने आधार सक्ती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.आधारकार्ड काढण्यास व बोगस विद्यार्थी शोधण्यास आमचा विरोध नाही. मात्र, याबाबत शासन व पालक यांचे योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने शाळांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. तसेच, राज्यातील विनानुदानिक शिक्षक संघटनेनेही आधार सक्तीला विरोधाचा पवित्रा घेतला असल्याचे पुणे जिल्हा विनानुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गवारी यांनी सांगितले.‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभर तांत्रिक अडचणींमुळे माहिती अद्ययावत करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे बोटांवर मोजण्याइतपत विद्यार्थ्यांची माहिती भरली जात आहे. त्यामुळे काही शाळांतील शिक्षकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. एका शाळेतील शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम मध्यरात्री दोन-तीन वाजेपर्यंत करावे लागत आहे. शाळेतील शिक्षिकाही दहा वाजेपर्यंत थांबतात. तर काही शिक्षक घरातील संगणकावर हे काम करत आहेत. माहिती भरली जात नसल्याने संच मान्यतेत शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरू नये, या भीतीने शिक्षकांची धावपळ सुरू आहे.