शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मिळाली मायेची ऊब अन् नवी ओळख!

By admin | Updated: January 14, 2017 02:41 IST

रानपाखरं बनून रानावनात भटकणारी लहान व लडिवाळ बाळं, कधी शाळेच्या मळक्या ड्रेसमध्ये तर कधी उसवलेल्या कपड्यांमध्ये

लोणावळा : रानपाखरं बनून रानावनात भटकणारी लहान व लडिवाळ बाळं, कधी शाळेच्या मळक्या ड्रेसमध्ये तर कधी उसवलेल्या कपड्यांमध्ये कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता जीवन जगणारी मावळ तालुक्यातील ठाकरवाड्या व आदिवासी वस्तीवरील मुले एकीकडे, तर दुसरीकडे शहरी भागातील मुलांना कपाटे कमी पडतात. ही सामाजिक दरी ओळखत योजक या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आदिवासी पाड्यांमध्ये तब्बल ४०० मुलांना स्वेटर, टी शर्ट, जीन्स, जर्किन, फ्रॉकचे वाटप करत मायेची ऊब अन् नवी ओळखही दिली आहे. निगडी येथील योजक या संस्थेने मावळातील आदिवासी पाड्यामधील ही परिस्थिती पाहिली व याबाबत काही तरी काम करण्याची जिज्ञासा मनाशी बांधली. याकामी त्यांना साथ मिळाली ती निगडीतील सिटी प्राइड शाळेची. शाळेच्या मुलांनी त्यांची सुस्थितीमध्ये असलेली व कमी वापरलेले कपडे धुऊन, इस्त्री करुन आणून दिले. यातून खऱ्या अर्थाने शहरातील व ठाकरवाडी पाड्यातील मुले यांची मने इंटरनेटशिवाय मायेने जुळली गेली. योजक संस्थेने पांगळोली, वाकसई, वनाठी, फणसराई, करंडोली या मावळातील वस्त्या, तसेच मूळगाव व भिलवले (खालापूर), ठाकूरवाडी, जांबरुंग व ताडवाडी या कर्जत तालुक्यातील वस्त्यांमध्ये जाऊन ५ ते १२ वयोगटातील मुलामुलींना मायेची ऊब देणारे कपडे वाटले. संस्थेचे संस्थापक अतुल इनामदार, दामा होले, पांडू होले, अशोक मेंगाळ, रामदास सांबरे, गोविंद पादीर, जानू मुकणे, अशोक जाधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी नवीन कपड्यांत शाळेमध्ये आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद संस्मरणीय होता, अशी भावना इनामदार यांनी व्यक्त केली. शहरी भागातील मुलांना लहानपणापासून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, ही भावना जागृत व्हावी याकरिता योजक संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी या उपक्रमात सहभागी होण्याचा विश्वास सिटी प्राइड शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)