शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो मार्गावरील भूगर्भाची तपासणी

By admin | Updated: December 28, 2016 04:38 IST

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरील भूगर्भातील (जिओ टेक्निकल इन्व्हिेस्टिगेशन) माती व खडकांची तपासणी केली जाणार आहे. मेट्रोच्या ३१ किलोमीटरच्या मार्गावर

पुणे : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरील भूगर्भातील (जिओ टेक्निकल इन्व्हिेस्टिगेशन) माती व खडकांची तपासणी केली जाणार आहे. मेट्रोच्या ३१ किलोमीटरच्या मार्गावर प्रत्येक १०० मीटर अंतरावर खोदाई करून माती व खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास करून त्यावरच मेट्रोच्या पुलाच्या पायाचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी चिंचवड दरम्यान १६.५९ किलोमीटर तर वनाज ते रामवाडी यादरम्यान १४.६५ किलोमीटर असा सुमारे ३१ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनीच प्राथमिक कामासही सुरुवात झाली असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली. ते म्हणाले, ३१ किलोमीटरच्या मार्गावर जमिनीखाली आणि जमिनीवर (टोपोग्राफीकल सर्वे) केला जाणार आहे. त्याची सुरूवात सोमवारपासून झाली आहे. संपुर्ण मार्गावर प्रत्येक १०० मीटर अंतरावर साधारणपणे २५ ते ३० मीटर खोल बोअर घेतले जातील. त्याद्वारे जमिनीखालील माती व खडकांचे नमुने संकलित करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची स्वतंत्रपणे तपासणी केली जाईल. यातून मार्गावरील भुगर्भातील जमीन व खडकाची भार तोलून धरण्याची क्षमतेचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार पायाचा आराखडा निश्चित करण्यात येईल.भुगर्भातील अभ्यासाबरोबरच मार्गावरील संपुर्ण जागेचे सर्वेक्षणही केले जाणार असून त्याला सुरूवात करण्यात आली आहे. हा अभ्यास साधारपणे दोन ते तीन महिने सुरू राहील. अभ्यास पुर्ण झाल्यानंतर मेट्रोचा अंतिम आराखडा तयार केला जाईल. त्याआधारारे निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे दिक्षीत यांनी स्पष्ट केले.