शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाई दाखवून पिढ्या सरल्या.. पदरी मात्र काहीच नाही

By admin | Updated: February 22, 2017 02:23 IST

निवडणुका आल्या, की ते दर वेळी मनापासून मतदान करतात. गाव उंच डोंगरावर व मतदान केंद्र डोंगराच्या

डिंभे : निवडणुका आल्या, की ते दर वेळी मनापासून मतदान करतात. गाव उंच डोंगरावर व मतदान केंद्र डोंगराच्या पायाथ्याशी. दर वेळी मतदानासाठी सकाळी डोंगर उतरायचा व मतदान केले, की डोंगर चढून संध्याकाळपर्यंत घरी पोहोचायचे. अशीच किती तरी वर्षे सरली. हाताच्या बोटाला लावलेली शाई दाखवून-दाखवून त्यांच्या पिढ्यान् पिढ्या सरल्या; मात्र अजूनही खेतेपठार व आपटी येथील आदिवासींच्या पदरी कसलेही दान पडले नाही. गावाला रस्ता व पाण्याची सोय व्हावी एवढी माफक मागणी येथील जनतेची आहे; मात्र अजून त्यांची ही मागणी मायबाप सरकारच्या गळी उतरली नाही.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उंच डोंगरावर वसलेली आपटी व खेतेपठार ही दोन आदिवासी लोकसंख्या असलेली गावे. या दोन्ही गावांत जवळपास अडीचशेच्या आसपास मतदान आहे. मात्र, या गावांत केवळ दळणवळणाच्या अडचणीपायी मतदान केंद्र नाही. या गावांतील मतदारांसाठी डोंगरपायथ्याशी असणाऱ्या गाडेकरवाडी येथे मतदान केंद्र आहे. दर वेळी निवडणूक आली, की मतदानासाठी येथील आदिवासींना ५ ते ६ किलोमीटरचा डोंगर उतरून मतदानासाठी खाली यावे लागते. दिवसा उन्हाचा त्रास जास्त होत असल्याने दर वेळेस येथील महिला व ज्येष्ठ मतदार सकाळीच मतदानासाठी गाडेकरवाडी येथे येत असतात व दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर डोंगर चढून घरी जातात. निवडणुका आल्या, की पिढ्यान् पिढ्या आम्ही मतदान करीत आलो आहे. मात्र, आमचे गाऱ्हाणे अजून तरी मायबाप सरकारच्या गळी उतरले नाही. आमच्या गावाला रस्ता नसल्याने दैनंदिन कामासाठी दर वेळी आम्हाला या डोंगरावरून चढउतार करावा लागत आहे. आपटीचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याला सुरुवात झाली नसल्याने अजून तरी किती दिवस गावकऱ्यांना या डोंगराशी टकरा घ्याव्या लागतात. आजही खेतेपठार व आपटी येथून अनेक महिला गाडेकरवाडी येथे असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्या होत्या. तसेच पुरुषही आले होते. मतदान झाल्यावर एका निवांत क्षणी उन्हे उतरायची वाट पाहत या महिला एका झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मतदानाच्या दिवशीच घडतो उपास  मतदान केंद्रापासून गाव लांब असल्याने मतदानाच्या दिवशी दिवसभर मतदानासाठी आलेल्या महिला उपाशीपोटीच असतात. आज गाडेकरवाडी येथे मतदानासाठी आपटी व खतेपठार येथून आलेल्या महिलांशी संवाद साधला असता, घरे वर डोंगरावर आसल्याने मतदानाच्या दिवशी दर वेळीच उपास घडत असल्याचे त्यांनी सांगितले. नुसतीच आश्वासने... आता जीव थकला हीच अवस्था खेतेपठारची येथील आदिवासीही उन्हाळा, हिवाळा व पावसाळ्यात डोंगराची चढउतार करून थकले आहेत. निवडणुका आल्या, की ‘तुमच्या गावाला रस्ता मंजूर करू, पाण्याची सोय करू’ अशी आश्वासने दिली जातात; मात्र मतदान झाले, की पुढील ५ वर्षे आमच्या अडचणींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे खेतेपठार येथील महिलांनी सांगितले.