शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिलेटिन स्फोटप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: April 15, 2016 03:31 IST

सुरवड जिलेटिन स्फोटप्रकरणी निष्काळजीपणा करून दोन कामगारांच्या मृत्यूस व तिघां जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत विहिरीचा गाळ काढणारा

इंदापूर : सुरवड जिलेटिन स्फोटप्रकरणी निष्काळजीपणा करून दोन कामगारांच्या मृत्यूस व तिघां जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत विहिरीचा गाळ काढणारा ठेकेदार व स्फोट घडवून आणणारा इसम या दोघांवर इंदापूर पोलिसांनी काल (दि.१४) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.हरिभाऊ शंकर शिंदे (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर),महेंद्र भीमराव पानसरे (रा.लाखेवाडी,ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सुरवड गावच्या हद्दीत गायरान जमीन गट क्रमांक २५८मधील भैरवनाथ मंदिराच्या शेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर आहे. ५० फूट खोल,२५ फूट व्यासाच्या या विहिरीचे पाणी कमी झाल्याने हरिभाऊ शिंदे या ठेकेदाराकडे विहिरीतील गाळ काढण्याचे काम दिले होते. विहीरीवर जिलेटिन उडविण्यासाठी छिद्र घेण्याचे काम संदीप बलभीम शिंदे (रा.शेटफळ हवेली, ता. इंदापूर) याच्याकडे देण्यात आले होते. जिलेटिनचा स्फोट करण्याची जबाबदारी महेंद्र भीमराव पानसरे याच्यावर सोपवली होती. सोमवारी (दि.११) संदीप शिंदे याने विहिरीमध्ये ३० छिद्रे पाडली. दुसऱ्या दिवशी बारा वाजता हरिभाऊ शिंदे व महेंद्र पानसरे यांनी विहिरीत जिलेटिनचे स्फोट घडवून आणले. मात्र सर्व छिद्रांमधील जिलेटिनचा स्फोट झाला की नाही, याची खात्री न करता हे दोघे जण निघून गेले. काल (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कांतिलाल नरहरी शिंदे (वय ५० वर्षे,रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), कृष्णा ऊर्फ बाबा महादेव भोसले (वय ५० वर्षे, रा. भांडगाव, ता. इंदापूर), महादेव मच्छिंद्र पताळे (वय ४०वर्षे), मारुती रामचंद्र चौगुले (वय ४५ वर्षे), नितीन वामन शिंदे (वय ३३ वर्षे, सर्व रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) हे सर्व कामगार काम करण्यासाठी विहिरीत उतरल्यानंतर, विहिरीतील छिद्रात अर्धवट राहिलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन दुर्घटना घडली. त्यामध्ये कृष्णा ऊर्फ बाबा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर कांतिलाल शिंदे यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना ते मरण पावले. महादेव मच्छिंद्र पताळे (वय ४० वर्षे), मारुती रामकृष्ण चौगुले (वय ४५), नितीन वामन शिंदे (वय ३३, सर्व रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) यांच्यावर अकलूज (ता. माळशिरस,जि. सोलापूर) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.