शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीवर बलात्कार करणारा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:05 IST

सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी संभाजी किसन कोलते (वय ४१) याला पोलिसांनी शनिवारी (दि.५) सायंकाळी महिनाभरानंतर अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी संभाजी किसन कोलते (वय ४१) याला पोलिसांनी शनिवारी (दि.५) सायंकाळी महिनाभरानंतर अटक केली. रविवारी (दि.६) न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पीडित मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये २९ जून रोजी तक्रार दिली होती. आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत वारंवार अत्याचार झाले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिच्या आईने विश्वासात घेऊन मुलीला विचारले असता हा प्रकार उघडकीस आला होता.तक्रारीवरून कोलते याच्यावर पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिना उलटला तरी आरोपीचा ठावठिकाणा लागला नाही. पीडित मुलीच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. आई-वडील मोलमजुरी करतात.यामुळे झालेल्या अन्यायाविरोधात दाद कोठे मागायची याची माहितीसुद्धा नाही. चौकशीसाठी मुलीला पोलीस ठाण्यात वारंवार जावे लागले. पण आरोपी मात्र मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांकडून तपास चालू असल्याचे उत्तर मिळत असल्याने आम्हाला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न पीडित कुटुंबाने उपस्थित केला होता. अखेर दबाव वाढल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला शनिवारी(दि. ५) सायंकाळी ताब्यात घेतले.