शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गावगुंड होणार तडीपार

By admin | Updated: January 25, 2016 00:59 IST

विविध औद्योगिक कंपन्यांवर नाना प्रकारांनी दबाव आणणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या ‘ग्रुप’ व गावगुंडांना तडीपार करण्याचे आदेश शिरूर पोलिसांनी दिले आहेत.

सुनील भांडवलकर,  कोरेगाव भीमाविविध औद्योगिक कंपन्यांवर नाना प्रकारांनी दबाव आणणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या ‘ग्रुप’ व गावगुंडांना तडीपार करण्याचे आदेश शिरूर पोलिसांनी दिले आहेत. रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात कंपन्यामध्ये लेबर पुरवणे, स्क्रॅपचा ठेका व अनेक कामे मिळविण्यासाठी स्थानिक व बाहेरच्या ‘ग्रुप’च्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने या विषयाला वाचा फोडणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली. त्याची दखल घेऊन पोलिसांनी कारवाईसाठी कंबर कसली आहे. ‘ग्रुप’मध्ये सामील असणाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती काढण्यात आली असून, त्यांच्या महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ कलम २, ३, ८, १३ (एम. पी. डी. ए.) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, तडीपारीचेही प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. अशा गुंडांवर व ग्रुपवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याने शिरूर पोलिसांनी खंबीर भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्रापूर व रांजणगाव पोलिसांनीही कारवाई करावी, अशी मागणी औद्योगिक क्षेत्रातून होत आहे. कारखानदारांना निरनिराळे ग्रुप वेठीस धरतात. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक गावपुढारी त्रास देऊ लागल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचे साकडे कारखानदारांच्या प्रतिनिधींनी पोलिसांना घातले आहे. अशा काही लोकांची नावेही पोलिसांना देण्यात आली आहेत. मात्र, कारवाई न झाल्याने कारखानदारांनी या गावगुंडांविरोधात मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली.