शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वारज्यात गॅसगळती होऊन भीषण स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 02:18 IST

पती-पत्नी जखमी : घराचे सेफ्टी डोअरही तुटले

पुणे : वारज्यातील राजयोग सोसायटीत घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होऊन भीषण स्फोट झाला़ हा स्फोट इतका मोठा होता, की त्या घरातील सेफ्टी डोअर उडून समोरील इमारतीबाहेर लावलेल्या गाड्यांवर पडले.या घटनेत घरातील पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ ही घटना रात्री ९ वाजता घडली़

छाया वचकवडे आणि ज्ञानेश्वर वचकवडे, अशी या पती-पत्नींची नावे आहेत़ याबाबत अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले, की वारजे गावठाणातील गीतांजली कॉलनीत राजयोग सोसायटी आहे़ तेथे वचकवडे यांचा माऊली सावली ही ३ मजली इमारत आहे़ तळमजल्यावर वचकवडे हे राहतात़ रात्री नऊच्या सुमारास ते दोघेही घरात असताना गॅसगळती झाली़ सिलिंडरमधील गॅस संपूर्ण घरात पसरला़ त्यानंतर त्याचा भीषण स्फोट झाला़ त्यात हे दोघे पती-पत्नी भाजले़ त्यांना नागरिकांनी तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले़हा स्फोट इतका भीषण होता, की त्यात स्वयंपाक घरातील किचन ओट्याचे मार्बल तुटले़ त्या खोलीचा दरवाजा तुटून पडला़ घराचे सेफ्टी डोअर तुटून उडाले व समोरच्या इमारतीजवळ लावलेल्या गाड्यांवर जाऊन पडले. त्यात काही गाड्यांचे नुकसान झाले़ घरातील सर्व सामान या स्फोटात अस्ताव्यस्त झाले़ घरातील फ्रिजही तुटला़ भिंतीला तडे गेले़ तसेच, शेजारच्या घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या़४गेल्या काही दिवसांत आग लागल्यानंतर त्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटांमध्ये ही घटना भीषण ठरली आहे़

टॅग्स :Puneपुणे