शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानाचे झाले भकास माळरान

By admin | Updated: May 7, 2017 03:16 IST

मगरपट्टा चौकातील डॉ. राममनोहर लोहिया उद्यानाला पालिकेच्या दुर्लक्षामुळे उतरती कळा लागली आहे.पालिका

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : मगरपट्टा चौकातील डॉ. राममनोहर लोहिया उद्यानाला पालिकेच्या दुर्लक्षामुळे उतरती कळा लागली आहे.पालिका प्रशासनाकडून या उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पुरेशा पाण्याअभावी उद्यानाची अवस्था एखाद्या भकास माळरानाप्रमाणे झाली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली खेळणी तुटली आहेत. मनोरंजनासाठी असलेले कारंजे बंद आहे. जॉगिंंग ट्रॅक आणि स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे लोहिया उद्यानात येणाऱ्या लहानग्यांसह मोठ्यांचाही हिरमोड होत आहे. सध्या सुटी असल्याने बच्चेकंपनीला तर खेळायला जावे कुठे, असा प्रश्न पडता आहे.काही महिन्यांपूर्वीच उद्यानाची दुरुस्ती करण्यात आली होती. याशिवाय मल्टिपर्पज अशी खेळणीही बसविण्यात आली; मात्र त्यानंतर केवळ देखभाल आणि नियमित दुरुस्तीअभावी येथील साहित्याची अवस्था अत्यंत खराब आहे. सकाळी व संध्याकाळी उद्यानात चालण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, तसेच तरुण आणि महिला वर्गाची चांगली वर्दळ आहे; परंतु जॉगिंंग ट्रॅकची व्यवस्थित निगा राखली जात नाही. याशिवाय जॉगिंंग ट्रॅकवर कचरा येत आहे. काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉकही अस्ताव्यस्त पडले आहेत. पुरेशा पाण्याअभावी उद्यानातील लॉन पिवळी पडली आहे. अर्ध्या भागातील लॉन आणि झाडे पूर्णपणे झळून खाक झाली आहेत. त्यामुळे हे उद्यान आहे की माळरान, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नळ तुटले आहेत. बसण्याचे काही बाकडे तुटले आहेत. जॉगिंंग ट्रॅकच्याच बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटले आहेत. नळही तुटले असून बाहेरील व आतील खालील फरशी खचली आहे.कारंज्याच्या हौदाभोवती नाही जाळीउद्यानात दोन कारंजी बसविण्यात आली आहेत; मात्र काही दिवस ती सुरळीत चालली. त्यानंतर एक कारंजे बंदच आहे. सध्या या कारंज्यात झाडांना पाणी देण्यासाठी पाणी साठविले जाते. मात्र, या कारंज्याच्या पाण्याच्या हौदाभोवती कोणतीही सुरक्षित जाळी नसल्याने लहान मुले हौदाकडे जाऊन पाण्यात पडण्याच्या धोका संभवत आहे.तुटलेल्या खेळणी दुरुस्तीसाठी पत्र दिले आहे. पुरेसे पाणी नसल्याने आणि ऊन जास्त असल्याने काही प्रमाणात झाडे सुकली आहेत. कारंज्याच्या हौदाकडे खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले जात आहे.- बाबासाहेब चव्हाण, उद्यान विभाग