शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार

By admin | Updated: April 29, 2017 03:48 IST

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शिरूर नगर परिषद येत्या सहा महिन्यांत तीन कोटी रुपये खर्चाचा कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे.

शिरूर : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शिरूर नगर परिषद येत्या सहा महिन्यांत तीन कोटी रुपये खर्चाचा कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. सध्या साठलेल्या जुन्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया सुरू केली जाणार असून, नगर परिषदेच्या या निर्णयामुळे नागरिकांना कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे.नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घनकचऱ्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, घनकचरा व्यवस्थापनविषयक कामे अभिसरण पद्धतीने करणे, ३० ते ३५ वर्षे जुन्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. घनकचरा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंदर्भात जानेवारी (२०१७) महिन्यात वर्तमानपत्रात दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यानुसार एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच हा अहवाल तयार होणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून नगर परिषदेस ३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, येत्या सहा महिन्यांत या निधीतून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कचराप्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.कचराप्रक्रिया प्रकल्प उभा राहिल्यानंतर कचराडेपोत कचरा शिल्लक राहणार नाही. यामुळे कचऱ्याला आग लागून सभोवतालच्या नागरिकांची तसेच पुणे-नगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता होणार आहे. कचरा डेपोत गेली ३० ते ३५ वर्षांपासून कचरा टाकला जात आहे. सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी ओला, सुका कचरा वर्गीकरण करून कचरा डेपोत टाकण्याच्या तसेच ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे.मात्र ३० ते ३५ वर्षांपासूनचा ओला, सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली असून, काही दिवसांतच या कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत ‘सर्वांना परवडणारी घरे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राज्यातील १४२ शहरांची निवड करण्यात आली आहे. यात शिरूरचा समावेश असून, शिरूर नगर परिषदेला २०२२पर्यंत एकूण १५७६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक तज्ज्ञ कक्ष स्थापित करणे, झोपडपट्टीच्या अनुषंगाने सर्वेक्षण करणे या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी शासकीय जागा निश्चित करून त्याचा आगाऊ ताबा घेणे आदी विषयांवर सभेत चर्चा झाली. (वार्ताहर)