शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कचराप्रश्नी कलगीतुरा

By admin | Updated: February 19, 2015 01:05 IST

शहरामध्ये निर्माण झालेला कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासन मुद्दामहून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

पुणे : शहरामध्ये निर्माण झालेला कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासन मुद्दामहून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. राज्य सरकार पुणेकरांबाबत संवेदनशील नसल्याचे दिसून येत असल्याची टीका महापौर दत्तात्रय धनकवडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. पालिकेतील सत्ताधारी व राज्यातील युती शासन आमने-सामने उभे टाकल्याने शहराचा कचराप्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.फुरसुंगी व उरूळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये ३१ डिसेंबरपासून ग्रामस्थांनी कचरा टाकू दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी घातलेल्या अटींचे पालन राज्य शासनाकडून झालेले नाही. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी वंदना चव्हाण व सभागृह नेते सुभाष जगताप उपस्थित होते. दत्तात्रय धनकवडे म्हणाले, ‘‘कचरा डेपोमुळे प्रकल्पबाधित झालेल्या ६५ जणांना महापालिकेच्या नोकरीवर घेण्याचे मुख्यमंत्र्यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ठरले आहे. मात्र, राज्य शासनाकडून त्यांना अद्याप प्रकल्पग्रस्तांचे दाखले दिले गेले नसल्याने त्यांना नोकरीवर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थांकडून अद्याप कचरा टाकू दिलेला नाही. मोशी व पिंपरी सांडस येथे कचरा डेपो उभारण्याबाबत शासनाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. बाणेर व उरुळी देवाची येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे ५०० टनाचे, तर शहरात ४० ठिकाणी २५० टनाचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.’’वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तेव्हा भाजपकडूनच त्याला विरोध करण्यात आला होता. यापूर्वी जेव्हा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा ते तातडीने सोडविण्यात आले होते.’’पुणेकरांच्या प्रश्नाबाबत सरकार संवेदनशील नाही, त्यामुळेच कचऱ्याच्या प्रश्नावर अद्याप मार्ग निघू शकलेला नाही, अशी टीका सुभाष जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हआघाडीचे सरकार असताना जेव्हा पुण्याच्या कचऱ्यासंदर्भात किंवा इतर प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन तातडीने त्यावर मार्ग काढले. शहराचे प्रश्न सोडविण्यात तेव्हाचे पालकमंत्री समक्ष होते, असे स्पष्ट करून वंदना चव्हाण यांनी सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले.पालिकेने अटी पाळल्या; सरकारने नाहीमुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महापालिकेने देवाची उरूळी व फुरसुंगी येथील पाणीपुरवठ्यासाठी तातडीने १६ कोटी ६२ लाख रुपये दिले आहेत. कचऱ्याचा कृती आराखडादेखील तयार करण्यात आला तसेच कचऱ्याचे जास्तीत जास्त वर्गीकरण केले जात आहे. मात्र, राज्य शासनाकडून मान्य केलेल्या अटींचे पालन न झाल्याने ग्रामस्थ कचरा टाकू देत नसल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले.