शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांतच जिरवला जातो कचरा

By admin | Updated: May 13, 2017 04:52 IST

मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी समस्या जाणवली नाही. काही सोसायट्या, घरे तसेच महापालिकेकडून चालविले जाणारे प्रकल्प यातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. धनकवडी प्रभाग ३९ चा बहुतेक भाग कंटेनरमुक्त आहे. यामध्ये ३ मोठ्या सोसायट्या आहेत. राघवनगर सोसायटीमध्ये १५० सदनिका आहेत व मागील दहा वर्षांपासून या ठिकाणच्या खत प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन खतनिर्मिती केली जाते. हे खत सोसायटीच्या बागेला वापरत असल्याने या ठिकाणची बागदेखील सदाहरीत व फुललेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच नर्सेस टाउन सोसायटीमध्येदेखील मागील दहा वर्षांपासून ३० बंगल्यांतून निघणारा २५ ते ३० किलो कचरा याच ठिकाणी जिरवला जात असून, निर्माण झालेले खत सभासदांना माफक दरात विकत असल्याचे व कमी मनुष्यबळ व जागेमध्ये कचरा जिरवला जात असल्याचे सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ यांनी सांगीतले.गुलाबनगर सोसायटीमध्येदेखील असाच खत प्रकल्प असून, यामधून सोसायटीमधील सर्व कचरा जिरवला जातो. नागरिक आपला कचरा आपल्याच घरात जिरवत आहेत, या प्रभागात २५ कचरा वेचक वर्गीकरण केलेला कचरा जमा करतात. यातून एका अठवड्याला ५-७ टन वर्गीकृत केलेला १४ प्रकारचा वेगवेगळा सुका कचरा विकून आपली उपजीविका करत असल्याचे आरोग्य निरीक्षक प्रदीप राऊत यांनी सांगितले.प्रभाग क्रमांक ४० दत्तनगरमध्ये १८० सदनिका असलेली आॅलिव्ह सोसायटीतदेखील दररोज निघणारा ८० ते १०० किलो कचरा या सोसायटीच्या आवारात खत प्रकल्पात जिरवला जातो. हेच खत सोसायटीमध्ये असणाऱ्या बागेत वापरले जाते, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन रवी अकोलकर यांनी दिली.