शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अलंकापुरीत वाढतायेत कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: April 29, 2017 03:51 IST

तीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावतीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून, शहराबाहेरील वर्दळ बळावत चालली आहे. त्यामुळे शहरासाठी विविध उपाययोजना आखूनही वाढत्या समस्यांना आवर घालण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. अलंकापुरीला चारही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांच्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यांलगतच कचऱ्यांचे मोठमोठे ढीग तयार होऊ लागले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण पसरत असून, स्थानिक नागरिकांना, भाविकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून अलंकापुरीला वडगावमार्गे जोडणाऱ्या रस्त्याच्या चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून साईडपट्ट्यालगत खोदण्यात आलेल्या साईडपट्ट्यांमध्ये साठला आहे. रस्त्यावरील सातशे ते आठशे मीटर अंतरावर आठ ते दहा ठिकाणी कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नगर परिषदेकडून रस्त्यावरील कचरा मजुरांच्या साह्याने उचलला जात आहे. मात्र चरांमधील कचरा ‘जैसे थे’ अवस्थेत पडून राहात असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, शिळे अन्न, शिळ्या पालेभाज्या, खरकटे अन्न अशा स्वरूपात हा कचरा असतो. त्यामुळे चार-पाच दिवसांत या कचऱ्याला उग्र वास सुटत आहे. परिणामी रस्त्यालगत असलेल्या स्थानिकांना तसेच वाटसरूंना दुर्गंंधीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत आहे. मुले शाळेत जाण्यासाठी स्कूलबसचा वापर करत असल्याने स्कूलबसची वाट पाहात बसलेल्या मुलांना दुर्गंधीयुक्त कचराकुंडी शेजारी उभे राहावे लागत आहे. मुलांना आजाराची लागण होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना आखण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.(वार्ताहर)