शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोसाठी पालिकेत नोकरी, फुरसुंगी-उरुळी देवाचीच्या तरुणांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 04:29 IST

महापालिकेला कचरा डेपोसाठी स्वमालकीची जमीन देणा-या उरुळी देवाची-फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या मुलांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळात आज मंजुरी देण्यात आली.

पुणे : महापालिकेला कचरा डेपोसाठी स्वमालकीची जमीन देणा-या उरुळी देवाची-फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या मुलांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळात आज मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. महापालिकेने सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला होता.एकूण ५७ युवकांना महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्यास मंजूरी मिळाली आहे. गेली अनेक वर्षे या ग्रामस्थांकडून ही मागणी करण्यात येत होती. त्यांच्या जागा घेताना महापालिकेने त्यांना असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर विविध कारणे देत त्याची अंमलबजावणी करणे टाळले जात होते. यापूर्वी महापालिकेने सुमारे ६२ जणांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मागणी केली जात होती. एकूण १५३ जागा महापालिकेने त्यावेळी संपादित केल्या होत्या. त्यांच्याकडून मागणी केली जात होती.ग्रामस्थांना दिलेले आश्वासन पूर्ण : बापटकचरा डेपोमुळे या परिसराचे सार्वजनिक आरोग्य बिघडले. जलस्रोत खराब झाले, त्यातून लहान मुले आजारी पडू लागली, अशी कारणे सांगत तीन महिन्यांपूर्वी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत कचरा डेपो बंद पाडण्याचे आंदोलन केले. त्यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्याचवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.