शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 29, 2014 23:24 IST

राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे भिमनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दौंड : राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे भिमनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची विल्हेवाट लावावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या परिसरातील रहिवाशांनी दिला आहे. दौंड -सिद्धटेक रोडलगतच हा मोठ्या स्वरुपाचा कचरा डेपो आहे. येथून मोठी दूर्गंधी येते. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मात्र, या दूर्गंधीमुळे नाक मुठीत धलन प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या कडेलाच कचरा डेपोचे डोंगर असल्याने याठिकाणी जनावरांचा वावर असतो. कचरा रस्त्यावरही येतो. तसेच शहरात आणि रस्त्यावर मेलेली जनावरे याच ठिकाणी आणून टाकतात. यामुळे भिमनगरचे रहिवाशी तसेच सद्धटेकला जाणारे भाविक त्रस्त झालेले आहेत. याच परिसरात विद्यालय असून भिमनगरची वस्ती गजबजलेली असते. या भागातील न्नागरीकांना यामुळे आजारही झडू लागले आहेत. येथे डेंग्युचा रुग्ण देखील आढळला होता. ४यासंदर्भात माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले की, दौंडच्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मी नगराध्यक्ष असताना वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र यातून काहीतरी चांगला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कटारिया म्हणाले. ४मुख्याधिकारी शिवाजी कापरे म्हणाले की, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मेरगळवाडी परिसरात बघितली होती, मात्र सदरची जागा वनखात्याची असल्याने यासंदर्भात भोपाळ येथील वनखात्याच्या मुख्य कार्यालयाकडे त्याचबरोबरीने केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा लवकरच नगर परिषद करणार आहे.